देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीत कृष्णा हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
in परभणी
0
परभणीत कृष्णा हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ
Please Share

अत्याधुनिक आरोग्यसेवा देणारे हॉस्पिटल : पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी : परभणी शहराच्या आरोग्य क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाला. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुसज्ज विभाग, आधुनिक ऑपरेशन थिएटर, आयसीयू व इतर वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. उपस्थित मान्यवरांनी अल्पावधीत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक आरोग्यसेवा केंद्राचे विशेष कौतुक केले.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, “आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे ही काळाची आवश्यकता आहे. कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील नागरिकांना महानगरांच्या तोडीच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि रुग्णकेंद्रित सेवा यामुळे हे हॉस्पिटल जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल.”

त्या पुढे म्हणाल्या की, “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट आरोग्यसेवा देण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजहिताचा आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांना उपचारासाठी औरंगाबाद, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या उपक्रमासाठी संचालक मंडळ, डॉक्टर व संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे. भविष्यात हे हॉस्पिटल केवळ परभणी जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी एक आदर्श आरोग्यसेवा केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा मला विश्वास आहे.”

या वेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून ग्रामीण भागात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. आधुनिक सुविधा, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर यांच्या माध्यमातून रुग्णांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, माजी आमदार हरिभाऊ लहाने, महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, विक्रांत विटेकर, जिल्हा परिषद सभापती वैशाली जाधव, ऐश्वर्या चव्हाण, कौशल्याबाई शिंदे, पार्वतीबाई मुंडे, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. सविता रोडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, भाजप जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सारिका पारवे, सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, पूर्णा नगराध्यक्षा विमलाबाई कदम, पालम नगराध्यक्षा मंगल शिरसकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रवींद्रनाथ चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य श्रीधरराव पारवे, भाजप सेलू तालुकाध्यक्ष गणेशराव काटकर, भाजप महिला मोर्चा महानगर अध्यक्षा मनीषा जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, २४x७ आपत्कालीन व ट्रॉमा सेवा, सुसज्ज ICU, NICU व PICU, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी व लॅबोरेटरी सेवा, इन-हाऊस फार्मसी, डे-केअर सुविधा तसेच विविध वैद्यकीय विभागांची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अस्थिरोग विभाग, सामान्य शल्यचिकित्सा विभाग, रेडिओलॉजी विभाग, बालरोग विभाग, जनरल मेडिसिन, नेत्ररोग विभाग, फिजिओथेरपी विभाग आदी विशेष विभागांद्वारे रुग्णांना सर्वसमावेशक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, वंध्यत्व उपचार, सांधेदुखी व सांधे प्रत्यारोपण, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, हाडांचे आजार व फ्रॅक्चर उपचार, नेत्र शस्त्रक्रिया, नवजात बालकांची तपासणी व उपचार, लसीकरण तसेच गंभीर रुग्णांसाठी सुसज्ज आयसीयू सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या वेळी डॉ. संजय रोडगे, डॉ. गणेश पारवे, डॉ. सविता रोडगे, डॉ. अपूर्वा पारवे रोडगे, डॉ. आदित्य रोडगे तसेच हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना हॉस्पिटलच्या संकल्पनेविषयी व उपलब्ध सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली. रुग्णांना केवळ उपचारच नव्हे तर विश्वास, आपुलकी, सुरक्षितता आणि मानवी संवेदनांनी परिपूर्ण आरोग्यसेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या या हॉस्पिटलचे स्वागत करत संचालक मंडळाचे अभिनंदन केले आणि परभणी जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची भावना व्यक्त केली.

Post Views: 1,639
Please Share
Previous Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते नूतनच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक

परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ