देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पत्रकारितेत तंत्रज्ञानाची कास धरा : गगन महोत्रा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2026
in महाराष्ट्र
0
voice of media
Please Share

पत्रकारितेची मूलभूत मूल्यांचे महत्त्व समजून घ्या : विलास बडे

बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यासच पत्रकारितेला चांगले दिवस येतील

पत्रकारांसाठी नवीन व्यावसायिक आणि आर्थिक उत्पन्नाच्या संधी निर्माण करणार

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी सत्य, विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये कायम जपावीत

नांदेड येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा स्तरीय कॅडर कॅम्पला साडेचारशेहून अधिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

२७ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे राज्यव्यापी कॅडर कॅम्प मालिकेचा भव्य समारोप होणार

नांदेड : पत्रकारितेचे भविष्य अधिक सक्षम, आधुनिक आणि विकसित करायचे असेल तर पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे. पत्रकारितेला चांगले दिवस आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा लागेल, असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय चीफ गगन महोत्रा यांनी केले.

व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा स्तरीय कॅडर कॅम्पला साडेचारशेहून अधिक पदाधिकारी उपस्थित असून, पत्रकारिता, संघटनात्मक बांधणी, आधुनिक तंत्रज्ञान, पत्रकारितेची मूल्ये आणि पत्रकारांच्या भविष्यासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर या कॅम्पमध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे.

कॅम्पमध्ये मार्गदर्शन करताना गगन महोत्रा यांनी पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या वेगवान युगात पत्रकारांनी केवळ पारंपरिक माध्यमांवर अवलंबून न राहता डिजिटल माध्यमे, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संवादप्रणालींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेला चांगले दिवस आणायचे असतील, तर पत्रकारांनी तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. बदल स्वीकारणारी पत्रकारिताच भविष्यात अधिक सक्षमपणे उभी राहील, असे गगन महोत्रा यांनी सांगितले.

गगन महोत्रा म्हणाले, व्हॉईस ऑफ मीडिया च्या पदाधिकारी आणि केवळ सदस्य पत्रकारांसाठी आम्ही आगामी काळात नवीन व्यावसायिक संधी घेऊन येत आहोत. या संधीच्या माध्यमातून पत्रकारांना पत्रकारितेचे काम करता करता आर्थिक उत्पन्नही मिळवता येईल, असा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. आता मोठ्या शहरांमध्ये जाऊनच काम करण्याची गरज नाही, तर आपल्या गावातून, आपल्या परिसरातून आणि आपल्या गल्लीतून काम करूनही चांगले उत्पन्न मिळविण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी अशाच नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने व्हॉईस ऑफ मीडिया पावले उचलत आहे.

पत्रकारितेची ओळख कायम ठेवत पत्रकारांना आर्थिकदृष्ट्याही सक्षम करण्याचा हा उपक्रम केवळ व्हॉईस ऑफ मीडिया च्या पदाधिकारी आणि सदस्य पत्रकारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी देशाच्या राष्ट्रीय संघटक सारिका पन्हाळकर यांनी विकसित पत्रकारितेची संकल्पना स्पष्ट करताना पत्रकारितेच्या विकासासाठी नवीन विचार, कौशल्यवृद्धी आणि बदलत्या काळानुसार ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. विकसित पत्रकारितेचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे असेल, तर आजपासूनच ठोस आणि सकारात्मक पावले उचलावी लागतील, असे सारिका पन्हाळकर यांनी स्पष्ट केले.

विलास बडे यांनी पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, माध्यमांचे स्वरूप कितीही बदलले तरी पत्रकारितेतील सत्य, विश्वासार्हता, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये कायम जपली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी पत्रकारितेची खरी ताकद तिच्या मूल्यांमध्ये आहे. पत्रकारांनी पत्रकारितेची मूल्ये अंगीकारून समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे, असे विलास बडे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी जगभरात सुरू असलेले काम कसे चालते हे समोर ठेवले. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी पत्रकारांच्या हितासाठी आगामी काळात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याबरोबरच त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ठोस उपक्रम राबविण्यावर संघटनेचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी कॅडर कॅम्पच्या व्यापक आयोजनाची माहिती दिली. परभणी येथून सुरू झालेल्या कॅडर कॅम्पच्या मालिकेने आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना कवेत घेतले आहे. मराठवाड्यानंतर ही कॅडर कॅम्पची चळवळ राज्यभर विस्तारत असून, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागांमध्येही कॅडर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. या संपूर्ण राज्यव्यापी कॅडर कॅम्प मालिकेचा भव्य समारोप २७ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मराठवाडा स्तरीय कॅडर कॅम्पचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी आयोजन करण्यात आले आहे. कॅडर कॅम्प यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी आणि राज्यस्तरीय नेतृत्व एकजुटीने काम करत असून, त्यांच्या मेहनतीमुळे नांदेडमध्ये संघटनात्मक शक्तीचे प्रभावी दर्शन घडत आहे. या कॅडर कॅम्पमध्ये प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख, राज्य सरचिटणीस चेतन कात्रे, नांदेडचे अध्यक्ष तुकाराम सावंत, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम, परभणीचे जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, लातूरचे जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जालन्याचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेराव आणि बीडचे जिल्हाध्यक्ष जालिंदर धांडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले आहेत. नांदेड चे आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.

तसेच राज्याचे सरचिटणीस गजानन देशमुख, सहसरचिटणीस श्रीनिवास भोसले, मराठवाडा संघटक ऋषीकेश कोंडेकर, मराठवाडा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे आणि मराठवाडा सरचिटणीस सुनील जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी या कॅडर कॅम्पच्या यशासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. नांदेड येथे सुरू असलेल्या या मराठवाडा स्तरीय कॅडर कॅम्पने केवळ पत्रकारांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली नसून, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणून संघटनात्मक बांधणीला नवी ऊर्जा दिली आहे. तंत्रज्ञानाचा स्वीकार, विकसित पत्रकारिता, पत्रकारितेची मूल्ये, पत्रकारांचे भविष्य आणि संघटनात्मक ताकद या महत्त्वपूर्ण सूत्रांवर झालेल्या मार्गदर्शनामुळे हा कॅडर कॅम्प पत्रकारितेला नवी दिशा देणारा ठरत आहे.

Post Views: 1,514
Please Share
Previous Post

शहापुरच्या महिलांची भक्तीमय कावड यात्रा

Next Post

परभणी जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

परभणी जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ