देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ रास्ता रोको

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 2, 2026
in परभणी
0
जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ रास्ता रोको
Please Share

सेलू-मानवतरोडवरील गोगलगावपाटीवर आंदोलन, पाथरीतही वाहतूक ठप्प

परभणी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षण संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यातील सेलू – मानवतरोड-परभणी रस्त्यावरील गोगलगावपाटी तसेच पाथरी शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

पाथरी शहरात संतप्त आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील चौकात ठिय्या मांडून मराठा आरक्षणा संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारी पातळीवरील निर्णयाचा निषेध करीत हैद्राबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र व त्यास वैधता द्यावी, यासह अन्य मागण्या केल्या. या मागण्या सरकारने मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संतप्त आंदोलनकर्त्यांनी दिला. दरम्यान, गुरुवारी आंदोलनकर्त्यांनी पाथरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सेलूजवळील गोगलगाव पाटीवर आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बुधवारी सेलू ते मानवतरोड रस्त्यावरील गोगलगाव पाटीवर सकल मराठा समाज बांधवांनी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि उपोषण सोडवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

‘परभणी जिल्हा बंद’ ची हाक

परभणी : मराठा आरक्षण संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणा संदर्भात सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ येथील सकल मराठा समाज बांधवांनी गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘परभणी जिल्हा बंद’ चे आवाहन केले आहे. या संदर्भात सकल मराठा समाजबांधवांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षकांना या संबंधीची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.

Post Views: 1,312
Please Share
Previous Post

खरीप २०२६ दुष्काळ गंभीर राष्ट्रीय आपत्ती घोषित करा

Next Post

गणेशोत्सवासाठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

गणेशोत्सवासाठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ