देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत लातूरचा डंका

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
in मराठवाडा
0
राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत लातूरचा डंका
Please Share

सेलूत प्रा.शंकर गंधम सर यांच्या स्मृतिनिमित्त आयोजन : ठाणे, बुलढाणा, मुंबई व नांदेडचेही विविध गटांत यश

सेलू : टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली परभणी जिल्हा रस्सीखेच असोसिएशन व मानस स्पोर्ट्स ॲकॅडमी, सेलू यांच्या वतीने कै. प्रा.शंकर गंधम सर यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित २७ वी राज्य ज्युनिअर व सिनिअर महिला रस्सीखेच क्रीडा स्पर्धा २०२६-२७ दि. ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान बाहेती मंगल कार्यालय, सेलू येथे उत्साहात संपन्न झाली.

स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर होते. यावेळी गटविकास अधिकारी उदय जाधव, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध नाईक, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, टग ऑफ वॉरचे राज्य सचिव जनार्दन गुपिले, उद्योजक अविनाश बिहाणी, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण देशपांडे, प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर नावाडे आदी उपस्थित होते.

कै. प्रा. शंकर गंधम यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करताना मिलिंद सावंत यांनी, राज्यस्तरीय स्पर्धांमुळे खेळाडूंना प्रेरणा मिळते. खेळाडूंनी सातत्याने सराव करून मैदानात आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन केले. या स्पर्धेत राज्यातील २२ जिल्ह्यांतील ३७५ खेळाडूंनी सहभाग घेतला. विविध गटांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यांनी क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

अंतिम निकाल : U-१३ ३४० किलो : लातूर प्रथम.U-१५ मुली ३६० किलो : लातूर प्रथम, नागपूर द्वितीय, वर्धा तृतीय.U-१५ मिक्स ४२० किलो : बुलढाणा प्रथम, पुणे द्वितीय.U-१७ मुली ४२० किलो : ठाणे प्रथम, लातूर द्वितीय, नागपूर तृतीय, बुलढाणा चतुर्थ.U-१७ मिक्स ४४० किलो : बुलढाणा प्रथम, ठाणे द्वितीय.U-१९ मुली ४६० किलो : लातूर प्रथम, पुणे द्वितीय, अकोला तृतीय.U-१९ मिक्स ५४० किलो : ठाणे प्रथम, मुंबई शहर द्वितीय, नागपूर तृतीय, पुणे चतुर्थ.सिनिअर महिला ५०० किलो : लातूर प्रथम, नांदेड द्वितीय, कोल्हापूर तृतीय, अकोला चतुर्थ.सिनिअर मिक्स ५८० किलो : मुंबई शहर प्रथम, नागपूर द्वितीय, नांदेड तृतीय, ठाणे चतुर्थ.

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सत्यनारायणजी लोया, अध्यक्ष, नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू होते. प्रमुख पाहुणे म्हणून दीपककुमार वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू, नगरसेवक संदीप लहाने, कपिल फुलारी, पोलीस निरीक्षक अरुण नागरे, जिल्हाध्यक्ष डॉ. शरद कुलकर्णी, जनार्दन गुपिले, मिलिंद पवार, प्राचार्य भास्कर मुंढे, रघुनाथ बागल, प्रशांत नाईक आदी उपस्थित होते. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन गणेश माळवे व राहुल वाघमारे यांनी केले, तर आभार प्रशांत नाईक यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनुराग आमटी, कुणाल चव्हाण, सत्यम बरकुले, राहुल घाडगे, अजय चव्हाण, वैभव रोडगे आदींनी परीक्षण घेतले.

Post Views: 1,071
Please Share
Previous Post

संत गजानन महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात

Next Post

पिके करपली; पण जायकवाडीचे पाणी ओढ्या-नाल्यात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पिके करपली; पण जायकवाडीचे पाणी ओढ्या-नाल्यात

पिके करपली; पण जायकवाडीचे पाणी ओढ्या-नाल्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

सेलू : ४९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण

सेलू : ४९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून सेलू पंचायत समितीने महिला...

सेलूत अभियंता दिन उत्साहात साजरा

सेलूत अभियंता दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा संकल्प सेलू : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त सेलू येथे अभियंता...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ