देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

हायटेक प्रचाराने वातावरण ढवळले

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 28, 2025
in परभणी
0
हायटेक प्रचाराने वातावरण ढवळले
Please Share

परभणीतील सातही नगरपालिका निवडणुकीतील चित्र; घरोघरी भेटी, रात्रीचा प्रचार जोरात


परभणी : जिल्ह्यातील सातही नगरपालिका निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी, नगराध्यक्षपदासह सदस्य पदाच्या रिंगणातील पक्ष अपक्ष उमेदवारांनी आपआपल्या प्रभागात हरतरेच्या प्रचाराद्वारे रणधुमाळी उडविले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी एलईडी स्क्रीनचा मोठा वापर करून सुरू केलेल्या हायटेक प्रचाराने वातावरण ढवळून निघाले आहे.
जिल्ह्यातील जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा आणि सोनपेठ या सातही नगरपालिकेत स्थानिक पुढाऱ्यांनी आणि दिग्गज उमेदवारांसह सक्षम अपक्षांनीही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुटुंबिय, सगेसोयरे व मित्र परिवाराला प्रचारात उतरविले आहे. एकूणच प्रचाराचा वेग पाहता प्रचार रंगात आला आहे.

▫️एलईडी स्क्रिन, ध्वनीक्षेपकाद्वारे प्रचार

सातही नगरपालिकांच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी अत्याधुनिक साधनांचा व तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे. विशेषतः प्रमुख चौकात, तसेच प्रभागात मतदारांचे लक्ष वेधण्याकरीता दर्शनीय भागात छोटा हत्ती या वाहनाला एलईडी स्क्रिन लावून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून विकासकामांची माहिती दिली जात आहे. तसेच शहर विकासाच्या योजनांचे चित्र मांडले जात आहे. तर काही ठिकाणी विरोधकांनी सत्तधार्‍यांमुळे बकाल झालेल्या भागांच्या चित्रिकरणाच्या क्लिप दाखवून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

▫️घरोघरी प्रत्यक्ष भेटी, पदयात्रांवर भर

नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांनी तसेच प्रमुख नेते, पदाधिकारी यांनी निवडणूकीत आपआपल्या प्रभागात मतदारांच्या गृहभेटीसह प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला आहे. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत घराघरातील प्रत्येक मतदारांपर्यंत संपर्क साधण्याचा कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मतदार यादीतील मतदारांशी केलेल्या संपर्काचा आढावा घेऊन उर्वरित मतदारांपर्यंत पोहोचण्याकरीता नियोजन केले जात आहे. प्रचारात पदयात्रांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. चिन्ह वाटप उशीराने झाल्याने अपेक्षांना मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.

▫️शुभेच्छा पुरे, मतरूपी आशीर्वाद द्या

उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासच प्राधान्य दिले आहे. त्यासाठी मोठ्या सभांवर होणारा खर्च, वेळेला फाटा दिला आहे. त्याऐवजी मतदारांना आकृष्ट करण्यासाठी गल्ली, वसाहतीतील प्रमुख व्यक्ती तसेच समाजातील प्रभावी व्यक्ती यांच्यासोबत छोट्या बैठकातून फिल्डींग लावली जात आहे. रस्ते , नाली आदी मूलभूत सुविधा आणि विकासाकामांबाबत आश्वासन दिले जात आहे. शुभेच्छा पुरे आता मतरूपी आशीर्वाद द्या अशी विनंती केली आहे. नेत्यांच्या कॉर्नर सभा लावून वातावरण निर्मिती करीत आश्वस्त केले जाते आहे.

▫️सोशल मीडिया, तंत्रज्ञानाचा मोठा वापर

प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी रील्स,
व्हॉट्सअप, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम यांसारख्या प्रभावी सोशल मिडीयाचा मुक्तपणे वापर केला जात आहे. व्हिडीओ क्लिपचाही मोठ्या प्रमाणावर भडिमार सुरु आहे. वेगवेगळ्या गाण्यांमधून प्रचार सुरू आहे. या शिवाय जाहीरनामा, विकासनामा, संकल्प पत्र आदी छापील मजकुराचे आकर्षक पत्रके वाटली जात आहे. प्रभागातील मोक्याच्या जागी डिजीटल बॅनरचा मोठा वापर केला जात आहे. याशिवाय ऑटो रिक्षातून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रचार रंगला आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देणार्‍या पोलचिटसाठी प्रमुख पक्षांच्या प्रचारप्रमुखांकडून स्वतंत्र ॲपचा वापर केला जात आहे. तसेच टेक्स्ट मेसेजद्वारे मतदान केंद्राची माहिती मतदारांपर्यंत थेट पोहोचवण्यावर भर दिला जात आहे.

▫️लक्ष्य गाठण्यासाठी साठी ‘लक्ष्मीअस्रा’ची चर्चा

प्रमुख पक्षांच्या नगराध्यक्ष पद तसेच तगड्या नगरसेवक उमेदवारांनी मतदार याद्यांची चाळणी करून त्यावर मोबाईल नंबर, संकेत खुणा टाकून बाजुने वळणार्‍या मतदारांना विविध पद्धतीने खूश करण्याचा सपाटा लावला आहे. विजयासाठीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ‘आर या पार’ च्या लढाईत दिग्गजांनी ‘लक्ष्मीअस्त्रा’च्या वापराचे काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी सुरू केल्याची चर्चाही रंगात आला आहे.

▫️परगावच्या मतदारांवर विशेष लक्ष

छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबईसह अन्य शहरांत नोकरी, रोजगारासाठी स्थलांतर केलेल्या मतदार निर्णायक ठरणार आहेत. यासाठी लढतील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी परगावच्या मतदारांचे पत्ते, मोबाईल नंबर मिळवून मतदानाला आणण्यासाठी वाहनांचे नियोजन केले असून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली असून ‘विशेष’ लक्ष दिले जात आहे.

Post Views: 1,679
Please Share
Previous Post

न्यायासाठी ‘एमआयएम’ला साथ द्या

Next Post

विज्ञान प्रदर्शनातून कल्पनाशक्तीला चालना

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विज्ञान प्रदर्शनातून कल्पनाशक्तीला चालना

विज्ञान प्रदर्शनातून कल्पनाशक्तीला चालना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ