
वाशिम : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न पुरस्कार प्रधान करण्यात यावा अशी मागणी तालुका मंगरूळपीर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुभक्त मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन द्वारे मागणी केली आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे थोर संत समाज सुधारक कवी आणि राष्ट्रभक्त होते त्यांनी आपल्या कार्यातून ग्राम स्वच्छता शिक्षणाचा प्रसार अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती तसेच सामाजिक क्षेत्रात एकोपा आणण्याबाबत जनजागृती केली त्यांच्या ग्रामगीता या महान ग्रंथातून ग्रामविकासाचा मार्ग दाखविण्याचा त्यांनी महत्त्वाचा आणि जय जगतेचा संदेश देश विदेशात पोहोचविला आणि मानवतेसाठी खूप मोठे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या कार्यांच्या उल्लेखनीय कार्य असून त्यांचा सन्मान होणे अत्यंत गरजेचे आहे मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी भजनी मंडळ जिल्हाध्यक्ष सुधाकर भांडेकर,राजेश बारड,सुधाकर क्षीरसागर,भाऊराव सुर्वे व गुरु प्रेमी उपस्थित होते.





