देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 17, 2026
in परभणी
0
बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ
Please Share

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ

देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- “पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली. त्यामुळेच आज माजी आमदारांची पोटदुखी चव्हाट्यावर आली आहे” असा स्फोटक आरोप आमदार सईद खान यांनी शनिवारी केला. स्वातंत्र्य दिनी शहरातील शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. खान यांनी माजी आमदार तथा स्वीकृत नगरसेवक बाबाजानी दुर्रानी यांच्यावर २४३ कोटी रुपयांच्या महाभ्रष्टाचाराचे थेट आरोप करत “पुरावे शासनाकडे दिले आहेत. लवकरच यांना जेलची हवा खावी लागणार” असा इशारा दिला.

“३६ एकरचे १२०० एकर कसे झाले?”

नगरपरिषदेत ८ कोटी ११ लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या माजी आमदारांनी उपोषण सुरू केल्यानंतर आ. खान यांनी पलटवार केला.”ज्या व्यक्तीकडे सत्तेत येण्यापूर्वी फक्त ३६ एकर जमीन होती, आज त्यांच्याकडे १२०० एकर जमीन कोठून आली? याची चौकशी झालीच पाहिजे. माजी आ. दुर्रानी खुनाच्या आरोपात ९ महिने जेलमध्ये होते. आता भ्रष्टाचाराच्या आरोपातूनही सुटका नाही” असे आ. खान म्हणाले.२४३ कोटींच्या लूटीचा चिट्ठा वाचून हादराल आ. खान यांनी एक-एक प्रकरण उघड करताना शिवसेना भवन हादरवले

* बैकार मोहल्ला येथील २ एकर कब्रस्थानची जागा बळकावली. किंमत २० कोटी. * न प समोरील विलास माथेले यांची २० कोटींची मौल्यवान जागा हडपली. * मुख्य रस्त्यावरील दुकाने जाळून राख केली. मूळ दुकानदारांना डावलले. रेडीमेड व्यापारी सिद्दीकी, अन्सारी आजही बेघर. * इंदिरा नगर येथील ईदगाहच्या अर्ध्या जागेत इमारत आणि उर्वरित २ एकरचे प्लॉट पाडून विक्री. * हुले सावकाराची जागा हडप करून त्यावर दुकाने बांधून विकली. * नगरपरिषदेला दान दिलेली गायवाड्याची जागा स्वतःच्या ताब्यात. * फक्राबाद येथील अंगणवाडीची जागा शाळेऐवजी खाजगींना भाड्याने दिली. * मानवत येथील अन्सारी बिरादारीच्या महिलांना डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण करून त्यांची जागा बळकावली. * मुंबईचे आसेफ खान यांची हायवे लगतची जागा बाप-लेकांनी बळकावली. * सर्विस रोडवर बेकायदा बाबा टॉवर. पाण्याच्या टाकीमागील लिंगायत समाजाची २ एकर जागा हडपून प्लॉटिंग. * पाणीपुरवठा घोटाळा २५ कोटींच्या योजनेत अवघे ४-५ कोटींचे काम. २ फिल्टरऐवजी १ च उभा केला. उर्वरित निधी लाटला. अनेक कंत्राटदारांची लाखो रुपयांची देणी बुडवून त्यांना देशोधडीला लावले.”या सर्व प्रकरणांचे नगरविकास खात्यामार्फत रि-ऑडिट सुरू आहे. काही प्रकरणात एसआयटी देखील बसली आहे. या महाभ्रष्टाचारात बाबाजानी दुर्रानी दोषी सिद्ध होणार आणि त्यांना जेलमध्ये जावेच लागेल” असा ठाम विश्वास आ. खान यांनी व्यक्त केला.

“जि.प. शाळा बांधकामात १ कोटींचा घोटाळा केला” असा नवा आरोप नगराध्यक्ष आसेफ खान यांनी केला. उपनगराध्यक्ष अलोक चौधरी म्हणाले “विकासाला साथ देण्याऐवजी विरोधासाठी विरोध केला जातो. यांच्याच दहशतीमुळे कायमस्वरूपी मुख्याधिकारी येत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार लांबतात.””आम्ही प्रधानमंत्री आवास आणि इंदिरा आवास योजनेचे ५०० हून अधिक लाभार्थ्यांना घरे दिली. पूर्वी हे लोक जाणीवपूर्वक गरीबांच्या नावाची अडवणूक करत होते” असा आरोपही चौधरी यांनी केला.शेवटी आ. सईद खान म्हणाले “जनतेने पस्तीस वर्षांची हुकूमशाही उलथवली. माझ्या कुटुंबाला जिल्हा बँकेची २ संचालक पदे मिळाली म्हणूनच यांची जळजळ होते. पण आता पाथरीकर जागा झाला आहे. लूटीचा हिशोब द्यावाच लागेल.”

या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष आसेफ खान, उपनगराध्यक्ष अलोक चौधरी, गोविंद हारकाळ, मुंजाजी भाले पाटील, लालू खान, मुंजाभाऊ नाना टाकळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post Views: 1,471
Please Share
Previous Post

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

Next Post

प्रिन्स इंग्लिश स्कूलची तेजश्री चौधरी प्रथम

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रिन्स इंग्लिश स्कूलची तेजश्री चौधरी प्रथम

प्रिन्स इंग्लिश स्कूलची तेजश्री चौधरी प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ