देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

डॉ. संजय रोडगे यांना ‘भारत गौरव पुरस्कार’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 25, 2025
in परभणी
0
डॉ. संजय रोडगे यांना 'भारत गौरव पुरस्कार'
Please Share

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय अवकाश दिन उत्साहात

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये २३ ऑगस्ट २०२५ रोजी ‘राष्ट्रीय अवकाश दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकार आणि इसरोने ‘भारत गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित केले आहे. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमाला श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) च्या यशस्वी मोहिमांवर आधारित परिपाठाने झाली. यामध्ये इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी सादरीकरण केले. विद्यार्थिनी आणि ‘रॉकेट सायंटिस्ट’ पूजा वायाळ हिने रॉकेट लॉन्चिंगचे प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तिच्यासह तनिष्का तेलभरे आणि तेजश्री चौधरी या विद्यार्थिनींचा सत्कार डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान शिक्षकांनी विशेष पुढाकार घेतला.

विविध स्पर्धा आणि उपक्रम

  • प्राथमिक विभाग: विद्यार्थ्यांनी इसरोच्या मोहिमांवर आधारित आकर्षक मॉडेल्स तयार केली.
  • चित्रकला स्पर्धा: विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता दाखवत सुंदर चित्रे रेखाटली.
  • माध्यमिक विभाग: विद्यार्थ्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, भाषण स्पर्धा आणि क्विझ स्पर्धेत सहभाग घेऊन इसरोच्या कार्याला मानवंदना दिली.

‘क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर’ची घोषणा

डॉ. संजय रोडगे यांनी यावेळी ‘क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर’ची माहिती दिली. ते म्हणाले की, या केंद्रातून भविष्यात विद्यार्थ्यांना जीपीएस लोकेशनद्वारे रॉकेट लॉन्चिंगचे मार्गदर्शन दिले जाईल. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवनिर्मितीची भावना वाढीस लागेल.

Post Views: 1,448
Please Share
Previous Post

नांदेड-धर्मावरम विशेष गाडीच्या ८ फेऱ्या सप्टेंबरमध्ये

Next Post

भगवान महावीर जयंती : निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूत गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भगवान महावीर जयंती : निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूत गौरव

भगवान महावीर जयंती : निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूत गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ