देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

गोदावरीची पाणीपातळी वाढली

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 23, 2025
in परभणी
0
गोदावरीची पाणीपातळी वाढली
Please Share

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची माहिती, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग; पाथरी उपविभागात लष्कराची तुकडी दाखल होणार

परभणी : परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी आणि इतर नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. सध्या जायकवाडी आणि माजलगाव धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. धोका पातळी गाठल्यास नागरिकांनी सुरक्षितस्थळी जावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
केले आहे.

लष्करी आणि एनडीआरएफ पथक तैनात

पाथरी उपविभागात संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन, छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय लष्कराची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे. मेजर कमाल यांच्या नेतृत्वाखाली ही तुकडी लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहे. तसेच, खबरदारी म्हणून एनडीआरएफचे पथक उपलब्ध करून देण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.

धरणे पूर्ण क्षमतेने भरली

परभणी जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना ही धरणे, तसेच ढालेगाव, तारुगव्हान, मुद्गल, दिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे निम्न व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकल्पांतून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, गोदावरी, पूर्णा, दुधना आणि त्यांच्या उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत.

यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, परभणी जिल्ह्यासाठी दिनांक २३ आणि २५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सुरक्षितस्थळी राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२४५२-२२६४०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर तसेच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांच्याशी ९९७५०१३७२६ किंवा ७०२०८२५६६८ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,148
Please Share
Previous Post

ओला दुष्काळ जाहीर करा

Next Post

सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ