अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बोर्डीकर कृषी महाविद्यालयात उपक्रम
सेलू : साहित्यरत्न डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सेलू व बोर्डीकर कृषी महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महाविद्यालयातील कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य तपासणी शिबिरात विद्यार्थी, विद्यार्थिनी व बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी चव्हाण यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शिबिरात एकूण १०८ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हे शिबिर आयोजित करण्यासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. हरबडे व त्यांचा आरोग्य तपासणी स्टाफ रेणूका काटकमवार (आयसीटीसी समुपदेशक), सविता दुमाने (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी) व स्वाती कुरलीये (नेत्र शल्य चिकित्सक अधिकारी) आवर्जून उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी साहित्यरत्न डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नथूराम अंभुरे, सचिव संकेत अंभुरे, महेश चव्हाण,, यश इंगळे, रोहन आडणे, प्रथम खरात, रोहित गोरे व बापू बावीसे आदींनी परिश्रम घेतले.





