देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूच्या शिवराज सूर्यवंशीचे प्रेरणादायी यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 3, 2026
in परभणी, राष्ट्रीय, शेक्षणिक
0
सेलूच्या शिवराज सूर्यवंशीचे प्रेरणादायी यश
Please Share

ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर ९१ वा, तर राज्यात १४ वा क्रमांक

सेलू जि.परभणी : सेलू येथील प्रिन्स इंग्लिश स्कूलचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी शिवराज योगेश सूर्यवंशी याने ‘ऑल इंडिया सैनिकी स्कूल एन्ट्रन्स एक्झाम २०२६’ (AISSEE 2026) मध्ये सुवर्णयश संपादन केले आहे. शिवराजने ३०० पैकी २८६ गुण मिळवून राष्ट्रीय पातळीवर ९१ वा रँक, तर राज्य पातळीवर मुलांच्या गटात १४ वा रँक मिळवला आहे. त्याच्या या यशाने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वयाच्या बाराव्या वर्षी देशपातळीवर शिवराजने मिळविलेले यश विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

देशसेवेचे ध्येय बाळगणाऱ्या शिवराजला सैन्यात जाण्यासाठी त्याची आई कल्पना सूर्यवंशी यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आई खाजगी शाळेत शिक्षिका तर वडील ॲड.योगेश बाबुराव सूर्यवंशी हे वकील असल्याने घरातून शिक्षणाचे वातावरण लाभले. आई कल्पना यांनी युवराजचे गुण ओळखून त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर विशेष लक्ष केंद्रीत केले. आईने दाखविलेल्या देशसेवेच्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी त्याने प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी कराड येथील मानेगाव कॅम्पस मधील ‘आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ मध्ये प्रवेश घेतला. तेथील संचालक सुयोग शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने शिवराजकडून करून घेतलेली तयारी आणि योग्य मार्गदर्शन, शिवराजाच्या सातत्यपूर्ण परिश्रमाला पालकांकडून मिळालेले प्रोत्साहन हे महत्त्वपूर्ण ठरले आहे. शिवराजच्या या यशाने सूर्यवंशी कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. भविष्यात भारतीय सैन्यात अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याचा मानस शिवराजने व्यक्त केला आहे.

ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा २०२६ (AISSEE) : ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE)ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे दरवर्षी आयोजित केली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील सैनिकी शाळांमध्ये इयत्ता ६ वी आणि ९ वीसाठी प्रवेश दिला जातो. २०२६ च्या शैक्षणिक वर्षासाठीची ही परीक्षा १८ जानेवारी २०२६ रोजी देशभर पार पडली. या परीक्षेचा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत निकाल घोषित करण्यात आला. अधिकृत वेबसाइट exams.nta.nic.in

Post Views: 1,723
Please Share
Previous Post

पारंपरिक मातीस्नानाने धुलिवंदन उत्साहात

Next Post

सेलू उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी घेतला आढावा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी घेतला आढावा

सेलू उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ