देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

संशोधकवृत्ती विकसित करण्याची गरज

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 11, 2025
in मराठवाडा, महाराष्ट्र, शेक्षणिक
0
संशोधकवृत्ती विकसित करण्याची गरज
Please Share

डॉ.अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन, सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूल परिसरात विज्ञान केंद्राचे भूमिपूजन

सेलू (जि.परभणी) : भारत जगातील अग्रगण्य देश व्हावा यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि तरूणाईमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टी व संशोधकवृत्ती विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांनी शनिवारी, ११ ऑक्टोबर रोजी सेलू येथे केले.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र राज्य आणि श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने “क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर” या महत्त्वाकांक्षी विज्ञान केंद्राचा भूमिपूजन सोहळा शनिवारी प्रिन्स इंग्लिश शाळेच्या परिसरात उत्साहात पार पडला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ.काकोडकर बोलत होते.

यावेळी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, वैज्ञानिक दिनेश जगताप, रामेश्वर मुंढे, श्रीनिवास औंधकर, आयोजक श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, डॉ.सुनील मोडक, प्रा.महेश पाटील, डॉ.रामराव रोडगे, शालिनी काटकर, डॉ.सविता रोडगे, डॉ.गणेश पारवे, डॉ.अपूर्वा रोडगे, सुजित काटकर, सुजाता काटकर, महंमद इलियास आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी “जे माहिती नाही ते जाणून घेण्याची जिद्द” बाळगावी, असे आवाहन करताना डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, की जशी संसाधने मिळतील तशी विज्ञान केंद्रे देशभर उभे राहावेत. सामूहिक प्रयत्नांतून आणि उद्दिष्टपूर्तीसाठी सातत्य ठेवल्यास भारत निश्चितच संशोधन आणि नवकल्पनांमध्ये अग्रणी ठरेल. तरुणाई ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. कामात सातत्य आणि उद्दिष्ट ठेवल्यास विज्ञान केंद्रांद्वारे नवकल्पना साकारणारी वैज्ञानिकांची पिढी तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमापूजन व द्वीपप्रज्वलनाने झाली. या विज्ञान केंद्रामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यास मदत होईल. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि नवकल्पनांचा विकास करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भविष्यात संशोधन आणि उद्योगक्षेत्राकडे वाटचाल करण्यासाठी हे केंद्र प्रेरणादायी ठरेल, असे डॉ.संजय रोडगे यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व प्रा. महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.सुनील मोडक यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले.

Post Views: 1,427
Please Share
Previous Post

सेलूमध्ये किसान सभा, माकपची निदर्शने

Next Post

२५१ तालुके पूर्णतः, तर ३१ तालुके अंशतः अतिवृष्टीग्रस्त

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
२५१ तालुके पूर्णतः, तर ३१ तालुके अंशतः अतिवृष्टीग्रस्त

२५१ तालुके पूर्णतः, तर ३१ तालुके अंशतः अतिवृष्टीग्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ