विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन
सेलू : नूतन विद्यालयात स्काऊट गाईड विभागातर्फे उजळणी वर्गाचे १ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक के. के. देशपांडे उपस्थित होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.जी. बोधनापोड आणि गाईड विभाग प्रमुख सुनीता सांगुळे उपस्थित होत्या.
परभणी भारत स्काऊट गाईडचे स्काऊट संघटक हेमंत कट्यारमल, जिल्हा गाईड संघटक शिवकाशी तांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्काऊट विभाग प्रमुख काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या फुलपगार यांनी केले तर अनंतकुमार विश्वंभर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट मास्टर बी.एम.गोरे, एम.टी. डमरे, ए.एल.आंबेकर, गाईड कॅप्टन चव्हाण पी. टी. यांचे सहकार्य लाभले.





