देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

पद्म पुरस्कार- २०२६ : नामांकन सादर करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत

admin by admin
July 31, 2025
in राष्ट्रीय
0
पद्म पुरस्कार- २०२६ : नामांकन सादर करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत
Please Share

नवी दिल्ली : पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकन/शिफारशी सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ वरून वाढवून १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जातील. सन २०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन प्रक्रिया १५ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे.

पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण हे पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. १९५४ मध्ये स्थापित, हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात. ‘उत्कृष्ट कार्या’साठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. कला, साहित्य आणि शिक्षण, खेळ, वैद्यक, समाजसेवा, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक कार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट आणि असाधारण उपलब्धी/सेवांसाठी हे पुरस्कार दिले जातात. जात, व्यवसाय, पद किंवा लिंग यांचा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. मात्र, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता इतर सरकारी कर्मचारी, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणारे कर्मचारी, या पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

भारत सरकारने पद्म पुरस्कारांना “लोकांचे पद्म” बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना नामांकन/शिफारशी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिक स्वतःलाही नामांकन करू शकतात. विशेषतः महिला, समाजातील दुर्बळ घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींची ओळख करून त्यांच्या उत्कृष्टता आणि उपलब्धींना मान्यता देण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आवाहन आहे.

नामांकन/शिफारशींमध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात सर्व संबंधित तपशील असावेत, यामध्ये नामित व्यक्तीच्या संबंधित क्षेत्रातील विशिष्ट आणि असाधारण उपलब्धी/सेवांचा स्पष्ट उल्लेख असलेला ८०० शब्दांचा वर्णनात्मक उद्धरण (citation) समाविष्ट असावा.

या संदर्भातील सविस्तर माहिती गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) ‘पुरस्कार आणि पदक’ या शीर्षकाखाली आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) उपलब्ध आहे. पुरस्कारांशी संबंधित अधिक माहिती आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकवर उपलब्ध आहेत.

Post Views: 783
Please Share
Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्टला

Next Post

परभणीच नाही, तर मराठवाड्यासाठी विकासाचे नवे पर्व !

admin

admin

Next Post
पावसात कुठलंही चुकीचं धाडस करू नका

परभणीच नाही, तर मराठवाड्यासाठी विकासाचे नवे पर्व !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ