वाशिम : दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी “स्वातंत्र्य दिनाचे” औचित्य साधून मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळेत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत विद्यार्थिनींमध्ये नशाविरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे उपाध्यक्ष संतोष राठोड यांनी भूषविले तसेच प्रमुख अतिथीचे पद प्राचार्या सुनिता पवार यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित विद्यार्थिनींना तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू तसेच इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. व्यसनामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, कुटुंबावर होणारा परिणाम तसेच शिक्षण व भवितव्यावर होणारे नुकसान याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.यानंतर सर्व विद्यार्थिनींनी “नशामुक्त भारत” प्रतिज्ञा घेतली. स्वतः कोणत्याही प्रकारचे व्यसन न करण्याचा तसेच आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी केला.या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, सकारात्मक विचार, सामाजिक जबाबदारी आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.या जनजागृतीपर उपक्रमास शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.सदर कार्यक्रमाचे संचालन एन.आर.राठोड यांनी केले आणि आभार मनिष भगत यांनी मानले.





