सेलू : एकीकडे परभणी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात इंधन साठा उपलब्ध आहे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर, तात्पुरती इंधन विक्री मर्यादा निश्चित केली. २०० आणि २००० रूपयांपर्यंतच पेट्रोल दिले जावे, असे जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी आदेश दिले. यामुळे गर्दी वाढून गुरुवारी, २६ मार्च रोजी दिवसभर पंपावर रांगा लागल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास सेलू शहरातील गुप्ता पंपावर “डिझेल स्टॉक नाही”, असे फलक झळकले. शहरातील केवळ बसस्थानकाजवळील पंप सुरू होता. तिथेही रात्री डिझेलसाठी रांगा लागल्या होत्या. तर पेट्रोल सकाळी मिळेल, असे सांगण्यात आले. यामुळे शुक्रवारी सकाळी पुन्हा तिथे रांगा लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, इंधन लवकरच उपलब्ध होणार आहे, असे सांगितले जात आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





