देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदी मिलिंद सावंत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 22, 2025
in परभणी
0
सेलू नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदी मिलिंद सावंत
Please Share

भाजपचे १४ नगरसेवकांसह दणदणीत बहुमत, काँग्रेस ७, शिवसेना शिंदे गट ४, तर एक अपक्ष विजयी, भाजपच्या गयाबाई सोनवणे यांना विक्रमी १९०२ मते

सेलू : सेलू नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय संपादन केला आहे. रविवारी २१ डिसेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात एकूण पाच फेऱ्यात मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दुपारी अधिकृत जाहीर केलेल्या निकालानुसार, नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे मिलिंद ज्ञानदेव सावंत यांनी १३९६० मते मिळवून विजयश्री खेचून आणली. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे आत्माराम बालाजी साळवे यांचा ३१७ मतांनी पराभव केला. साळवे यांना १३६४३ मते मिळाली. एकूण २६ प्रभागात भाजपने १४ नगरसेवकांसह दणदणीत बहुमत मिळविले आहे. काँग्रेस ७, शिवसेना शिंदे गट ४, तर अपक्ष कपील फुलारी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या इतर उमेदवारांमध्ये भगवान नारायणराव गायकवाड यांना ४८२ मते, ॲड.जितेश सुभाष घायतडक यांना ३८१ मते, ॲड. प्रशांत दगडु ढोले ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांना ११५६ मते, संजय भास्कर सरोदे यांना २६९ मते आणि सिध्दार्थ अरविंद सोनकांबळे यांना १४१ मते मिळाली, तर ४३१ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला.

▫️२६ प्रभागांमधील निकाल असा

प्रभाग १ अ मध्ये सुनीता सुगोंध काकडे (भाजप) यांनी १४८१ मते मिळवून विजय मिळवला, प्रतिस्पर्धी उज्वला प्रशांत धापसे (काँग्रेस) यांना ८०५ मते मिळाली. प्रभाग १ ब मध्ये साईराज मुकेश बोराडे (भाजप) यांनी १३५१ मते मिळवत बाजी मारली, तर समीर गणेशराव नाईकवाडे (अपक्ष )यांना ९५० मते मिळाली. प्रभाग २ अ मध्ये डॉ.अनिकेत अशोकराव जोगदंड (शिवसेना शिंदे गट) यांना ७८७ मते आणि मारोती रामचंद्र चव्हाण (भाजप) यांना ७४१ मते मिळाली. प्रभाग २ ब मध्ये प्रवीणा संभाजी पवार (कॉंग्रेस) यांनी ९२७ मते मिळवून विजय मिळवला, तर ताईबाई बाबुराव काटे (भाजप) यांना ७३० मते मिळाली. प्रभाग ३ अ मध्ये विनोद मधुकर धापसे (कॉंग्रेस) यांनी ११८४ मते मिळवून वर्चस्व राखले, तर विकास प्रभाकर धापसे (भाजप) यांना ५९७ मते मिळाली. प्रभाग ३ ब मध्ये मालनबी अफसर खान पठाण (कॉंग्रेस) यांनी १०५० मते मिळवून विजय मिळवला, तर खाजाबी लतीफ शेख (भाजप) यांना ४१२ मते मिळाली.
प्रभाग ४ अ मध्ये शांताबाई प्रकाशसिंह रघुवंशी (भाजप) यांना ११२२ मते आणि प्रियंका आकाश अंभुरे (शिवसेना शिंदे गट) यांना ७०५ मते मिळाली. प्रभाग ४ ब मध्ये दिपक सखाराम कोल्हाळ (भाजप) यांनी १५८५ मते मिळवून मोठा विजय मिळवला, तर शेख रहीम शेख गुलाम (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांना ४७८ मते मिळाली. प्रभाग ५ अ मध्ये सपना हरि काळे (शिवसेना शिंदे गट) यांनी ११६५ मते मिळवून यश संपादन केले, तर मनीषा संदीपराव मुरकुटे (अपक्ष) यांना ५४४ मते मिळाली. प्रभाग ५ ब मध्ये संदीप हरिभाऊ लहाने (शिवसेना शिंदे गट) यांनी १५२६ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. प्रभाग ६ अ मध्ये कमल रंगनाथअप्पा झमकडे (भाजप) यांनी १२२५ मते मिळवून बाजी मारली, तर प्रियंका सचिन शिंदे (काँग्रेस) यांना ५७१ मते मिळाली. प्रभाग ६ ब मध्ये मनिष मुरलीधर कदम (भाजप) यांनी ८८० मते मिळवून विजय मिळवला, तर प्रिती बाबासाहेब भाबट (काँग्रेस) यांना ४६८ मते मिळाली.
प्रभाग ७ अ मध्ये आशा नामदेव पहाडे (भाजप) यांनी ६७३ मते मिळवून विजय मिळवला, तर विमल दयानंद साळवे (कॉंग्रेस) यांना ५१५ मते आणि कुमारशांतीनंद साळवे यांना ५०८ मते मिळाली. प्रभाग ७ ब मध्ये गणेश दत्ताराव सवने (भाजप) यांनी ७११ मते मिळवून विजय मिळवला, तर हमीद दादामिया सय्यद यांना ६५८ मते आणि विनोद सुधाकर तरटे यांना ५६४ मते मिळाली. प्रभाग ८ अ मध्ये मिलींद मुकुंदराव पवार (काँग्रेस) यांनी ११०४ मते मिळवून विजय मिळवला, तर विनोद हरिभाऊ बोराडे (भाजप) यांना १०१६ मते मिळाली. प्रभाग ८ ब मध्ये महानंदा हेमंतराव आडळकर (कांग्रेस) यांनी १२३७ मते मिळवून यश मिळवले, तर लता प्रफुल गिल्डा (भाजप )यांना ८३९ मते मिळाली. प्रभाग ९ अ मध्ये कपिल श्यामराव फुलारी (अपक्ष) यांनी १०४३ मते मिळवून विजय मिळवला, तर
विठ्ठल उत्तमराव काळबांडे (भाजप) यांना ८९३ मते मिळाली. प्रभाग ९ ब मध्ये अनुपमा प्रभाकर देवधर (शिवसेना शिंदे गट) यांनी १२०८ मते मिळवून यश मिळवले, तर पल्लवी योगेश कुलकर्णी (काँग्रेस) यांना ६६१ मते मिळाली.
प्रभाग १० अ मध्ये सफिया बेगम अ. रशीद (कॉंग्रेस) यांनी १४६६ मते मिळवून मोठा विजय मिळवला, तर प्रभावती बबन अप्पा झमकडे यांना ७९३ मते मिळाली. प्रभाग १० ब मध्ये पवन हेमंतराव आडळकर (काँग्रेस) यांनी १५२४ मते मिळवून बाजी मारली, तर तन्वीर कुरेशी यांना ५५१ आणि शिवाजी खेडकर यांना ५१२ मते मिळाली. प्रभाग ११ अ मध्ये अनवरखान दिलावरखान पठाण तडवी (भाजप) यांनी ९८६ मते आणि राजाराम सिताराम काळे यांनी ८१६ मते मिळवली. प्रभाग ११ ब मध्ये शेख रहिमा बेगम शेख शफिक (भाजप) यांनी १११९ मते मिळवून विजय मिळवला. सय्यद सना सोहेल यांना (काँग्रेस) ६७३ मते मिळाली. प्रभाग १२ अ मध्ये शिला रामेश्वर काजळे (भाजप ) यांनी १२५३ मते मिळवून यश मिळवले, तर शेख अख्तरबेगम अयुब यांना ९०१ मते मिळाली. प्रभाग १२ ब मध्ये रहेमत अली खान अजीज अली खान तडवी (भाजप) यांनी १२६२ मते मिळवून विजय मिळवला. शेख शफी चॉंद (काँग्रेस) यांना ६२९ मते मिळाली. प्रभाग १३ अ मध्ये गयाबाई विठ्ठलराव सोनवणे (भाजप) यांनी १९०२ मते मिळवून विक्रमी विजय मिळवला, तर ज्योती गजानन बागल (काँग्रेस) यांना ८३० मते मिळाली. प्रभाग १३ ब मध्ये प्रभाकर भाऊसाहेब सुरवसे (भाजप) यांनी ९६१ मते मिळवून विजय मिळवला, तर कपिल वैजनाथ पडूळ यांना ७७९ मते मिळाली. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, मुख्याधिकारी तुकाराम कदम, नायब तहसीलदार जयश्री कोल्हे, विजय मोरे, गजानन इनामदार, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, उपमुख्याधिकारी बी.एस.चव्हाण, मुकुंद आष्टीकर, विजय बोधले, ओम कानडे, नंदकिशोर दायमा तसेच मतमोजणी कर्मचारी, उपविभागीय अधिकारी कार्यालयर, तहसील आणि पालिका कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 2,226
Please Share
Previous Post

कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा

Next Post

माजी नगराध्यक्ष बोराडे यांच्या पराभवाची हुरहूर ; कॉंग्रेसचे मिलिंद पवार ठरले वरचढ

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
माजी नगराध्यक्ष बोराडे यांच्या पराभवाची हुरहूर ; कॉंग्रेसचे मिलिंद पवार ठरले वरचढ

माजी नगराध्यक्ष बोराडे यांच्या पराभवाची हुरहूर ; कॉंग्रेसचे मिलिंद पवार ठरले वरचढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ