देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘श्यामची आई’ ने संस्कारक्षम पिढी घडविल्या : मंजुषा बोराडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 24, 2025
in परभणी, मराठवाडा
0
‘श्यामची आई’ ने संस्कारक्षम पिढी घडविल्या : मंजुषा बोराडे
Please Share

सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात कार्यक्रम

सेलू : साने गुरुजी लिखित श्यामची आई’ हे पुस्तक केवळ बालकांसाठीच नव्हे, तर सर्वांना योग्य दिशा देणारे आणि सुसंस्कारित करणारे आहे. हे पुस्तक केवळ एक साहित्यकृती नसून आईच्या रूपात आपल्या सर्वांच्या मनावर संस्कार करणारे आणि समाजात कसे वागावे, हे शिकवणारे माध्यम आहे, ‘श्यामची आई’ संस्कारक्षम पिढी घडविण्यात मोलाचे योगदान देत आहे, असे प्रतिपादन न्यू हायस्कूल प्रशालेतील सहशिक्षिका मंजुषा बोराडे यांनी केले.

सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित एक दिवस एक पुस्तक या उपक्रमांतर्गत ३५ वे पुष्प मंगळवारी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात गुंफण्यात आले.यावेळी पुढे बोलताना मंजुषा बोराडे यांनी श्यामची आई पुस्तकातील साने गुरुजींच्या मातृहृदयाचे भावविश्व श्रोत्यांपुढे मांडले. आजच्या काळात मुलांना संस्कारक्षम घडवण्यासाठी प्रत्येक मातेने या पुस्तकाचे वाचन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी मधुकर काष्टे म्हणाले की, आपण सर्वजण साने गुरुजींच्या संस्कारांनी प्रभावित झाल्यामुळे येथे एकत्र आलो आहोत. मातृत्व आणि मातृहृदयाचे वर्णन मानवी हृदयाला स्पर्श करून जाते. हे पुस्तक म्हणजे सुसंस्कारित मुले घडवणारी एक शाळाच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचे वाचन केले आहे, त्यांचे व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे आणि प्रगल्भ पाहावयास मिळते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये संमेलनातील कवी म्हणून सहभागी झालेले गौतम सूर्यवंशी, वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल डॉ. सुरेश हिवाळे आणि रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पांडुरंग पाटणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले, सूत्रसंचालन आम्रपाली खाजेकर यांनी तर आभार प्रदर्शन पांडुरंग पाटणकर यांनी मानले. या प्रसंगी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर मुळावेकर, दत्तात्रय माकोडे, एन. एम. देशपांडे, रवी मुळावेकर, गंगाधर गुंजकर, श्रीपाद कुलकर्णी, नारायण पाटील, मधुकर वाकडीकर, दत्तात्रय आंधळे, आनंद देशमुख, रेखा आर्वीकर, शुभदा गोळेगावकर, वंदना कुलकर्णी, बालाजी बुधवंत, शिवाजी बोचरे, विजय बोचरे, शेख मौजम आदींची उपस्थिती होती.

Post Views: 1,773
Please Share
Previous Post

सेलू नगराध्यक्ष : सावंत यांची बाजी, साळवे यांना हुलकावणी

Next Post

वनामकृवि आणि आयपीडीए यांच्यात सामंजस्य करार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वनामकृवि आणि आयपीडीए यांच्यात सामंजस्य करार

वनामकृवि आणि आयपीडीए यांच्यात सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ