देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिक्षक गव्हाणे यांची बदली रद्द करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
in परभणी
0
शिक्षक गव्हाणे यांची बदली रद्द करा
Please Share

रायपूरचे ग्रामस्थ आक्रमक, सेलू गटशिक्षणाधिकारी कार्यालयात वर्ग भरवण्याचा इशारा

सेलू : सेलू तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक माधव गव्हाणे यांची झालेली बदली तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे. ही बदली रद्द न झाल्यास जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ग थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरवले जातील, असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या संदर्भातील मागणीचे निवेदन शुक्रवारी, १९ जून २०२६ रोजी गावकऱ्यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात आले. तसेच या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.मौजे रायपूर येथील आदर्श शिक्षक श्री.गव्हाणे यांची ३० सप्टेंबर २०२५ च्या पटसंख्येचा आधार घेऊन अतिरिक्त ठरवून बदली करण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत आजरोजी शाळेतील वरच्या वर्ग ६, ७ आणि ८ वी ची एकूण पटसंख्या ७५ पेक्षा जास्त आहे. नियमानुसार रायपूर येथील शाळेत तीन पदे असणे आवश्यक असताना, सध्या केवळ दोनच शिक्षकांवर संपूर्ण भार आला आहे. श्री.गव्हाणे यांच्यामुळेच शाळेतील विद्यार्थी संख्या टिकून असून त्यांच्या या बदलीमुळे सर्व गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन गव्हाणे यांच्या बदलीचा आदेश लवकरात लवकर रद्द करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. आदेश रद्द न केल्यास २३ जून २०२६, मंगळवार रोजीपासून थेट गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच शाळेचे वर्ग भरवण्यात येतील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर रामेश्वर गाडेकर, रामेश्वर शंकरराव गाडेकर, दादासाहेब गाडेकर, लक्ष्मण गाडेकर, माणिक काजळे, वैभव गाडेकर, अंकुशराव गाडेकर, शिवाजी हिंगे, विकास हिंगे, राजेश गाडेकर यांच्यासह अनेक अर्जदार व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,590
Please Share
Previous Post

आज सांगता : श्रीसोनामाय प्रतिष्ठानचा ‘श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ

Next Post

खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ