देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम; भावी आमदारकीसाठी अनेकांना लागले ‘डोहाळे’!

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2026
in वाशिम
0
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम; भावी आमदारकीसाठी अनेकांना लागले ‘डोहाळे’!
Please Share

शाळा भेटी, शिक्षकांशी संवाद अन् विविध प्रश्नांचा पाठपुरावा; वाशिम जिल्ह्यात इच्छुकांची पायपीट सुरू

फुलचंद भगत, वाशिम : वाशिम जिल्ह्यात आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना हळूहळू वेग येताना दिसत आहे. निवडणुकीला अद्याप अवकाश असला तरी शिक्षक मतदारसंघातून भावी आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. विविध शाळांना भेटी देणे, शिक्षकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या प्रश्नांच्या पाठपुराव्याचे आश्वासन देणे, अशा माध्यमातून संभाव्य उमेदवारांकडून आपापली राजकीय ‘भूमिका’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही इतर विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळी असते. येथे शिक्षक मतदारांची संख्या मर्यादित असली तरी प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क, वैयक्तिक संवाद आणि सातत्याने संपर्कात राहण्याला मोठे महत्त्व असते. त्यामुळे निवडणुकीच्या संभाव्य मैदानात उतरण्याची तयारी करणाऱ्या इच्छुकांनी आतापासूनच शिक्षकांच्या संपर्कात राहण्यास सुरुवात केली आहे.

*शाळांच्या दारात इच्छुकांची हजेरी*

वाशिम जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भेटी देताना काही इच्छुक दिसून येत आहेत. शिक्षकांच्या अडचणी, रिक्त पदे, पदोन्नती, बदली प्रक्रिया, वेतन व सेवाविषयक प्रश्न, जुनी पेन्शन, अनुदानित शाळांचे प्रश्न, शैक्षणिक साधनसामग्री, अतिरिक्त प्रशासकीय कामाचा वाढता बोजा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक सुविधा आदी विषयांवर चर्चा केली जात आहे.काही जण शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटनात्मक समीकरणे समजून घेत आहेत, तर काही जण थेट शिक्षकांशी वैयक्तिक संपर्क वाढविण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ‘शिक्षकांचे प्रश्न’ हा आगामी काळातील इच्छुकांच्या राजकीय अजेंड्याचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

*प्रश्नांची यादी मोठी; आश्वासनांनाही उधाण*

शिक्षकांच्या प्रश्नांची व्याप्ती मोठी असल्याने इच्छुकांकडूनही विविध प्रश्नांवर आवाज उठविण्याची तयारी दाखविली जात आहे. शाळांमधील पायाभूत सुविधा, शिक्षकांची रिक्त पदे, ऑनलाइन व प्रशासकीय कामाचा वाढता ताण, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न, ग्रामीण भागातील शाळांना भेडसावणाऱ्या अडचणी यासह शिक्षकांच्या सेवेशी संबंधित अनेक प्रश्न पुढे केले जात आहेत.मात्र, निवडणुकीच्या तोंडावर केवळ भेटीगाठी आणि आश्वासनांपेक्षा शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्षात कोण किती वेळ आणि ताकद खर्च करतो, याकडे शिक्षक मतदारांचे लक्ष राहणार आहे.

*‘संपर्क’ वाढविण्यासाठी विविध उपक्रम*

आगामी काळात शिक्षक मतदारसंघाच्या राजकारणात सक्रिय होऊ इच्छिणाऱ्यांकडून विविध सामाजिक, शैक्षणिक व शिक्षकहिताच्या उपक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता आहे.शिक्षक सभा,शिक्षक दिन, शैक्षणिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण, मार्गदर्शन शिबिरे, चर्चासत्रे तसेच शिक्षकांच्या समस्यांवर निवेदने देणे यामधून आपली उपस्थिती अधोरेखित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.विशेष म्हणजे, काही इच्छुकांकडून सोशल मीडियावरही शिक्षकांच्या प्रश्नांशी संबंधित भूमिका मांडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे या हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.राजकीय पक्षांची भूमिका ठरणार महत्त्वाची शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाबरोबरच शिक्षक संघटनांची भूमिका आणि वैयक्तिक संपर्क यांनाही मोठे महत्त्व असते. त्यामुळे विविध राजकीय पक्षांशी जवळीक असलेले तसेच शिक्षक संघटनांमध्ये सक्रिय असलेले अनेक चेहरे संभाव्य उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, कोण स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आणि कोणत्या शिक्षक संघटनेचा कोणाला पाठिंबा मिळणार, यावरही आगामी राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

*‘डोहाळे’ अनेकांना; प्रत्यक्ष मैदानात कोण उतरणार?*

सध्या तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चर्चेचा विषय बनू लागली आहे. आमदारकीच्या इच्छेने अनेक जण शिक्षकांच्या दारापर्यंत पोहोचत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात किती जण उतरतात, हे निवडणूक जवळ आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.दरम्यान, केवळ निवडणूक जवळ आली म्हणून शिक्षकांची आठवण काढणाऱ्यांपेक्षा सातत्याने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी उपलब्ध राहणारा, प्रश्नांचा अभ्यास करणारा आणि शासनस्तरावर त्यांचा पाठपुरावा करणारा प्रतिनिधी कोण, याचा निर्णय शिक्षक मतदारच घेणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या शाळा भेटी आणि शिक्षक गाठीभेटींकडे राजकीय तयारी म्हणून पाहिले जात असून, आगामी काळात वाशिम जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघाचे राजकारण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post Views: 36
Please Share
Previous Post

पारवा येथे श्री भवानी माता जगदंबा देवीचा यात्रा महोत्सव

Next Post

सेलूतील नमो उद्यानाचे दिमाखदार लोकार्पण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूतील नमो उद्यानाचे दिमाखदार लोकार्पण

सेलूतील नमो उद्यानाचे दिमाखदार लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ