देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

अंतःकरण आणि त्यातील सत्य कधीही बदलत नाही

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 1, 2026
in मराठवाडा
0
अंतःकरण आणि त्यातील सत्य कधीही बदलत नाही
Please Share

स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन, जगन्नाथ पुरी येथे श्रीमद् भागवत महापुराण कथेची उत्साहात सांगता

श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम : येथील इंद्रद्युम्ननगरीमध्ये आयोजित श्रीमद् भागवत महापुराण कथेची सांगता गुरुवारी, १ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात झाली. मराठवाडा आणि विदर्भातील भाविकांनी आयोजित केलेल्या या ज्ञानयज्ञाच्या सांगताप्रसंगी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी भक्ती आणि ज्ञानाचा महिमा विशद केला. कथेचा सार सांगताना स्वामीजी म्हणाले की, संसार सतत परिवर्तनशील आहे, परंतु आपले अंतःकरण आणि त्यातील सत्य कधीही बदलत नाही. श्रीकृष्णाच्या चरणकमलांची भक्ती हाच संपूर्ण श्रीमद् भागवत ग्रंथाचा मुख्य सार आहे. भक्तीसोबत येणारे ज्ञान आणि वैराग्य हे मानवी जीवनातील अज्ञान व मृत्यूची भीती दूर करतात. ज्या परंपरेने आपल्याला हा भक्तीचा दिवा दिला आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहून भक्तीचा मार्ग कधीही सोडू नये, असे आवाहन त्यांनी आशीर्वचनपर बोलताना केले.

राधेश्याम चांडक (बुलडाणा), नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ. विनोद मंत्री (परभणी) आणि नंदकिशोर बाहेती (सेलू) व त्यांच्या परिवाराने या सोहळ्याचे २६ डिसेंबर २०२५ पासून विविध कार्यक्रमांसह नेटके नियोजन केले होते. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सेलू येथील श्री रोकडिया हनुमान चालीसा मंडळाच्या भाविकांनी १०८ वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण करून नवीन वर्षाचे स्वागत केले.

या प्रसंगी स्वामीजींनी सांगितले की, हा दिवस केवळ इंग्रजी नवीन वर्षाचा प्रारंभ नसून, अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा दोन वर्षांचा पूर्तता दिवस म्हणजेच प्रतिष्ठा द्वादशी आहे. हा दिवस भारताच्या आत्मविश्वासाचा आणि गौरवाचा आहे. या पावन प्रसंगी भारतवर्ष आता एका नवीन पर्वात प्रवेश करत आहे.

▫️राष्ट्र कल्याणाचे चार संकल्प

स्वामीजींनी नवीन वर्षात राष्ट्र कल्याणासाठी चार संकल्प घेण्याचे आवाहन केले. यामध्ये पूर्वजांच्या बलिदानाची जाणीव ठेवण्यासाठी परंपरेचा बोध, निसर्ग रक्षणासाठी पर्यावरण रक्षण, स्वतःचे कुटुंब व राष्ट्रासाठी सुरक्षेची सिद्धता आणि जाती-भेद विसरून संघटित होण्याची समरसता या चार गोष्टींचा समावेश आहे. नवीन वर्षात हनुमानजींच्या गुणांचे स्मरण समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाप्रभु जगन्नाथांची भक्ती सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि चैतन्य घेऊन येवो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. या सोहळ्याला मराठवाडा व विदर्भातील शेकडो भाविक उपस्थित होते.

Post Views: 1,872
Please Share
Previous Post

नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण व नगरसेवकांचा सत्कार सोहळा

Next Post

ग्राहक पंचायतीचे कार्य समाजपयोगी : भूषण काळे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ग्राहक पंचायतीचे कार्य समाजपयोगी : भूषण काळे

ग्राहक पंचायतीचे कार्य समाजपयोगी : भूषण काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ