देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

वीरशैव लिंगायत स्मशानभूमीची दयनीय अवस्था

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 24, 2026
in मराठवाडा
0
वीरशैव लिंगायत स्मशानभूमीची दयनीय अवस्था
Please Share

सेलूच्या मुख्याधिकार्‍यांना शिवा संघटनेचे निवेदन; पर्यायी जागेची किंवा दुरुस्तीची मागणी

सेलू : येथील सर्वे नंबर ३३ मधील सातबारा नोंदणीनुसार ८० आर जमीन वीरशैव लिंगायत समाजासाठी वीरशैव मोक्षधाम दफनभूमी म्हणून राखीव आहे. मात्र, सध्या या दफनभूमीची अत्यंत दुरावस्था झाली असून शहरातून व कत्तलखान्याकडून येणारे नाल्याचे पाणी थेट दफनभूमीत घुसत आहे. यामुळे अंत्यसंस्कार करणे जिकीरीचे बनले असून प्रेताची विटंबना होत असल्याची तक्रार शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या गंभीर प्रश्नाबाबत संघटनेने सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. शहरात वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या सुमारे ४ ते ५ हजार असून त्यांच्यासाठी ही जागा दफनभूमी म्हणून देण्यात आली आहे. परंतु, सांडपाण्यामुळे या जागेत सर्वत्र दलदल झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डा खोदल्यास लगेच पाणी निघत असल्याने अंत्यविधी करणे अशक्य झाले आहे. गेल्या १५ वर्षांपासून समाजाच्या वतीने तत्कालीन प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जात आहे, मात्र केवळ आश्वासनापलीकडे काहीही ठोस कारवाई झालेली नाही.निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, नवीन पर्यायी जागा मिळेपर्यंत सध्याची जागा पूर्णपणे समतल करून द्यावी. तसेच दोन्ही नाल्यांचे पिंचिंग करून स्मशानभूमीत पाणी घुसणार नाही, याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. यासोबतच अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, लाईट आणि हातपंपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. वालूर रोडकडून स्मशानभूमीकडे येणाऱ्या जुन्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून तो रस्ता मोकळा करावा आणि संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.निवेदन देतेवेळी नगरसेवक कपिल फुलारी, गणेश सवणे, मनीष कदम यांच्यासह शिवा संघटनेचे उपजिल्हाप्रमुख शिवकुमार नावाडे, तालुकाप्रमुख निजलिंगआप्पा तरवडगे, सोशल मीडिया प्रमुख प्रदीप डफूरे, गुरुबसआप्पा पंचगले, बबनआप्पा झमकडे, गणेश गोरे, रामा कटारे, अमोल पाचलेगावकर आदी उपस्थित होते. उपमुख्याधिकारी चव्हाण यांनी हे निवेदन स्वीकारले.

Post Views: 1,691
Please Share
Previous Post

विज्ञान आठवड्यानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

पंधरा दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकळाच

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पंधरा दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकळाच

पंधरा दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकळाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ