देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रारंभ

admin by admin
July 26, 2025
in परभणी, मराठवाडा
0
सेलूत श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रारंभ
Please Share

पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांच्या प्रवचनाने श्रीगणेशा : सेलूत महिनाभर भाविकांना श्रवणाची आध्यात्मिक पर्वणी

सेलू : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू आणि शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रावणमासानिमित्त महिनाभर आयोजित श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेला पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांच्या प्रवचनसेवेने शुक्रवार, २५ जुलैपासून सुरुवात झाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आपली सेवा रुजू करणार आहेत.

प्रवचनसेवेचे हे २१ वे वर्ष आहे. या वर्षी २५ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत ही प्रवचन सेवा होणार आहे. दरम्यान, १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ७ ते १० या वेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आलेले आहे. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शंतनू महाराज पाठक (वालूर) यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी या प्रवचन सेवेत तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभाग घेऊन श्रवणाचा तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्ञान आणि भक्तीचा २१ वर्षांचा अखंड प्रवास

श्रावणमासानिमित्त आयोजित श्री ज्ञानेश्वरी प्रवचन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे हे २१ वे वर्ष आहे. कोविड काळातदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही प्रवचन सेवा अखंडपणे चालवली गेली आहे. प्रवचन सेवेत श्री ज्ञानेश्वरीवरील गाढे अभ्यासक असलेल्या नामवंत व्यक्तींनी सेवा दिली आहे. या प्रवचन सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवचनासाठी निमंत्रित सेवेकरी कसल्याही प्रकारचे मानधन न घेता नियमित सेवा देत आहेत. याशिवाय वेळेची शिस्त पाळली जाते. अभ्यासू श्रोते व आयोजनातील साधेपणा आयोजकांकडून आजही जपला गेला आहे. श्रोत्यांसाठी ही प्रवचनमाला सेवा म्हणजे एक आध्यात्मिक पर्वणीच ठरत आली आहे.

अध्यात्मिक क्षेत्रातील नामवंतांकडून प्रवचन सेवा

  • २५ जुलै – पुरुषोत्तम महाराज वालूरकर
  • २६ जुलै – भगवान महाराज गजमल, डासाळकर
  • २७ जुलै – शिवाजी महाराज खवणे
  • २८ जुलै – विष्णुदास नामदेव महाराज ढवळे, चारठाणा
  • २९ जुलै – लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी, माजलगाव
  • ३० जुलै – भगवान महाराज सेलूकर
  • ३१ जुलै – शरदराव डोलारकर, परतूर
  • ०१ ऑगस्ट – मोहन महाराज हातकडके, सेलू
  • ०२ ऑगस्ट – तेजस सुधीर कुलकर्णी, पुणे
  • ०३ ऑगस्ट – प्रजापिता ब्रह्माकुमारीज
  • ०४ ऑगस्ट – अंबादासराव पावडे, हादगाव
  • ०५ ऑगस्ट – अर्जुन महाराज होलिया, सेलू
  • ०६ ऑगस्ट – महादेव महाराज ईरळदकर, ईरळद
  • ०७ ऑगस्ट – अशोक महाराज आकात, सेलू
  • ०८ ऑगस्ट – चंद्रकांत महाराज सातोनकर, सातोना
  • ०९ ऑगस्ट – प्रा. डॉ. श्रीहरी रंगनाथ महाराज पितळे, मेहकर
  • १० ऑगस्ट – रमेश महाराज मोरे, देवगावफाटा
  • ११ ऑगस्ट – अनंत महाराज पावडे, हादगाव
  • १२ ऑगस्ट – शंकर माधवराव आजेगावकर
  • १३ ऑगस्ट – प्रभाकरराव नित्रुडकर, परभणी
  • १४ ऑगस्ट – बालासाहेब महाराज आवटे, म्हाळसापूर
  • १५ ऑगस्ट – (माऊली जन्मोत्सव) संजय महाराज पिंपळगावकर
  • १६ ऑगस्ट – प्रणव जनार्दनराव पटवारी, माजलगाव
  • १७ ऑगस्ट – सुनील महाराज आष्टीकर
  • १८ ऑगस्ट – जयंतराव महाराज धानोरकर (छत्रपती संभाजीनगर)
  • १९ ऑगस्ट – श्री स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, यशवाडी
  • २० ऑगस्ट – वैभव महाराज जगताप, पांडेपोखरी
  • २१ ऑगस्ट – अमोल महाराज बोधले, डिकसळकर
  • २२ ऑगस्ट – विठ्ठल महाराज सायखेडकर
  • २३ ऑगस्ट – सौ. सुजाताताई भंडारे, परभणी
Post Views: 1,182
Please Share
Previous Post

शेतपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत

Next Post

साईबाबा बँकेची ३० वी वार्षिक सभा उत्साहात

admin

admin

Next Post
साईबाबा बँकेची ३० वी वार्षिक सभा उत्साहात

साईबाबा बँकेची ३० वी वार्षिक सभा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ