देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

शेतपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत

admin by admin
July 26, 2025
in मराठवाडा
0
विभागीय आयुक्त पापळकर यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
Please Share

विभागीय आयुक्त पापळकर यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

परभणी : परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे व नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकरी व नागरिकांना एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) आणि एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील तरतुदींनुसार आर्थिक मदत देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले आहेत. दरम्यान, या अनुषंगाने जिल्हाप्रशासनाने तालुकास्तराव विशेष पथके गठीत करून कार्यवाही सुरू केली आहे.

१५ मंडळात अतिवृष्टीने मोठे नुकसान

१७ जुलैरोजी परभणी तालुक्यातील पेडगाव व जांब, पाथरी तालुक्यातील पाथरी, हादगाव व कासापुरी, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, वाधी धानोरा, सेलू तालुक्यातील सेलू, देऊळगाव, चिकलठाणा, मोरेगाव, आणि मानवत तालुक्यातील मानवत महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर २२ जुलैरोजी पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव, कासापुरी, जिंतूर तालुक्यातील बोरी, वाधी धानोरा, सेलू तालुक्यातील चिकलठाणा, मोरेगाव, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ आणि मानवत तालुक्यातील केकरजवळा या महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टी झाली.

पथके गठीत, बाधितांना लवकरच मदत मिळणार

विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार, जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी २४ जुलै रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या आणि घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंच्या नुकसानीचे पंचनामे करून, बाधित शेतकरी व नागरिकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफमधील तरतुदींनुसार लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने, तालुकास्तरावरुन विशेष पथके गठीत करण्यात आली असून, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. निकषानुसार आर्थिक मदत देण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल, असे प्रशासनाने कळवले आहे.

Post Views: 1,089
Please Share
Previous Post

ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षा : राजवाडीच्या शाळेतील ३३ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रारंभ

admin

admin

Next Post
सेलूत श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रारंभ

श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ