वर्षा इंगोले उपाध्यक्षपदी, कार्यकारिणीची सर्वानुमते निवड
सेलू : सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत २३ जुलै रोजी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची पालक-शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मकरंद दिग्रसकर होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया, सचिव डॉ. प्रा. विनायकराव कोठेकर, दत्तराव पावडे, सुखानंद बेंडसुरे आणि उल्हास पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे यांनी केले. अहवाल वाचन अमोल हळणे यांनी केले. गीतमंचच्या विद्यार्थिनींनी रेखा डोळस यांच्या मार्गदर्शनात स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन सोनाली कुबरे यांनी केले, तर आभार संपदा जहागीरदार यांनी मानले. यावेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेत पालक-शिक्षक सदस्यांची आणि नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी वर्षा इंगोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सभेस पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सभेसाठी सहकार्य केले.





