देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized

पाथरी, सोनपेठमध्ये अतिवृष्टी; कासापुरीत ढगफुटी

admin by admin
July 25, 2025
in Uncategorized
0
Please Share


पिकांचे प्रचंड नुकसान : नदी, नाल्यांना पूर, ठिकठिकाणी वाहतूक ठप्प

देशनिष्ठ वृत्तसेवा, परभणी : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम वगळता विविध भागात सोमवारी, २१ जुलै रात्री जोरदार पाऊस झाला. पाथरी तालुक्यात तब्बल ११७.८ मिलीमीटर, त्यापाठोपाठ सोनपेठ तालुक्यात ७३.४ मिलिमीटर पाऊस झाला. परभणीसह सेलू, मानवत, जिंतूरमध्ये रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. मंगळवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी परभणी ४३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पाथरी तालुक्यातील कासापुरी महसूल मंडळातील गावात सात तासांत ढगफुटी सदृश्य २१५ मिलीमीटर पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसामुळे दुधना, कसुरा, करपरा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाथरी-सेलू मार्गासह कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने छोट्या मोठ्या ओढ्याच्या मार्गावरील वाहतूक सकाळी ठप्प झाली होती. विविध महसूल मंडळात चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पाथरी व सोनपेठ तालुक्यातील अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाले, ओढ्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.‌ पाथरी ते सेलू मार्गावर कसुरा नदीला पूर आल्याने दुपारी चार वाजताही वाहतूक सुरळीत झाली नव्हती. वालूर, डासाळा, सातोना वाहतुकही बंद होती. जिंतूर, परभणी मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस मिलिमीटरमध्ये : परभणी ३१.२, गंगाखेड १३.८, पाथरी ११७.८ जिंतूर ४७.६, पूर्णा २८.९, पालम ७.९, सेलू ५३.६, सोनपेठ ७३.४ मानवत ४९.६

कासापुरीत ढगफुटी; २१५ मिमी पाऊसपाथरी तालुक्यातील बाभळगाव (९८ मिलिमीटर), हदगाव (१११ मिलिमीटर), कासापुरी (२१५ मिलिमीटर), जिंतूर तालुक्यातील बोरी १०६ मिलीमीटर, वाघी धानोरा ६८.५०, सेलू तालुक्यातील चिकलठाणा ८७.७५, मोरेगाव ७९.२५, तर सोनपेठ १३६ आणि केकरजवळा ( ता.मानवत) ९८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश्य पावसामुळे कासापुरी, जवळाझुटा, नाथरा, पाथरगव्हाण बुद्रुक, पाथरगव्हाण खुर्द यासह अन्य गावातील शेतजमीनीला तळ्याचे स्वरूप आले आहे. जवळाझुटा शिवारातून वाहणाऱ्या महानंदा नदीसह, ओढ्यांना पूर आल्याने पाणी शेतजमीनीत घुसले. जमीन खरडून गेल्या आहेत.

कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, तर बहुतांश भागात पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे सोयीबीन, कापूस, मूग उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. –राजेंद्र जवळेकर, शेतकरी, जवळाझुटा ( ता.पाथरी)

Post Views: 99
Please Share
Previous Post

श्री गणेशोत्सव २०२५ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा

Next Post

बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत पालक-शिक्षक संघाची सभा उत्साहात

admin

admin

Next Post
https://deshnishth.com/?p=3006

बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत पालक-शिक्षक संघाची सभा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ