देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized

श्री गणेशोत्सव २०२५ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा

admin by admin
July 25, 2025
in Uncategorized, महाराष्ट्र, सामाजिक
0
Please Share

रुपये ५ लाखांचे प्रथम पारितोषिक, सहभागी होण्याचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे आवाहन

देशनिष्ठ वृत्तसेवा, परभणी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असलेल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले आहे.

२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान, सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समित्या सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळांना भेट देऊन जिल्हास्तरीय परीक्षण करतील. राज्यस्तरीय परीक्षणात विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या प्रत्येक जिल्ह्यांतून ३ शिफारसी, तर इतर ३२ जिल्ह्यांतून प्रत्येकी १ शिफारस अशा एकूण ४४ शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी निवडल्या जातील. ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क असून, गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या विविध समाजोपयोगी कार्यांना प्रोत्साहन देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी, संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

असा करा अर्ज

♦ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील.
♦ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२५ आहे.
♦ अपूर्ण अर्ज रद्द केले जातील.

असे होईल मूल्यांकन

♦ सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन
♦ संस्कृतीचे जतन व संवर्धन
♦ गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांच्या जतन व संवर्धनासाठी जनजागृती
♦ विविध सामाजिक उपक्रम व कार्ये
♦ पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावट
♦ ध्वनिप्रदूषणविरहित वातावरण
♦ गणेशभक्तांसाठी उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधा

पारितोषिके आणि प्रमाणपत्रे

♦ प्रथम पारितोषिक : रुपये ५ लाख आणि प्रमाणपत्र
♦ द्वितीय पारितोषिक: रुपये २.५ लाख आणि प्रमाणपत्र
♦तृतीय पारितोषिक: रुपये १ लाख आणि प्रमाणपत्र
♦ जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना प्रत्येकी रुपये २५ हजार आणि प्रमाणपत्र

Post Views: 1,366
Please Share
Previous Post

शरदराव भांडेकर : कासार समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या साथीने पुढे जाऊ

Next Post

पाथरी, सोनपेठमध्ये अतिवृष्टी; कासापुरीत ढगफुटी

admin

admin

Next Post

पाथरी, सोनपेठमध्ये अतिवृष्टी; कासापुरीत ढगफुटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ