देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized

शरदराव भांडेकर : कासार समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या साथीने पुढे जाऊ

admin by admin
July 25, 2025
in Uncategorized
0
शरदराव भांडेकर : कासार समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या साथीने पुढे जाऊ
Please Share

कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाची वार्षिक सभा उत्साहात

राज्यभरातील कासार समाज बांधवांची मोठी उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर : अखिलभारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, २० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील श्री कालिकादेवी मंदिर एन-९ सिडको येथे उत्साहात पार पडली.

समाजोपयोगी कामासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळांची १०० वर्षांपूर्वी स्थापना झालेली आहे. संस्थेची ध्येय धोरणे समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवणे आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवून विकास साधणे, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील उत्कर्ष मंडळ आणि कासार साथी मंडळाच्या सहकार्याने मध्यवर्ती मंडळांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष पु.भा.अक्कर होते. व्यासपीठावर शामराव किवळेकर, मध्यवर्ती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शरदराव भांडेकर, रमेश अंधारे, शामशेठ कासार, नंद‌किशोर शिलवंत, डॉ.रमाकांत दगडे, मनीष चुटके, राजेंद्र तांबट, ॲड.लिना आडे, शिवराज आंदोले, सचिव प्रतिभा वेळापुरे, पद्‌मीनी मंडलेश्वर काळे, उज्जला कोळपकर, श्रद्धा घडामोडे, महेश कोकीळ, आर.डी.शिनगारे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात मागील वर्षीचा अहवाल व कार्यआढावा अरुण वेळापुरे यांनी सादर केला.

मध्यवर्ती मंडळाच्या माध्यमातून आजवरच्या सर्वच अध्यक्षांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे, असे अध्यक्ष श्री.भांडेकर यांनी मनोगतात नमूद केले. मात्र, मागील अनेक वर्षांपासून काही विघ्नसंतोषी मंडळी मंडळाच्या कार्यात तांत्रिक अडचण निर्माण करून समाजाच्या विकासाआड येत आहेत, असा आरोपदेखील त्यांनी केला. मागील सहा वर्षांपासून संघटन, संवाद आणि विकास या त्रिसूत्रीने राज्यभरातील कासार समाज जोडत असताना, बांधवांचे खूप प्रेम मिळत आहे. समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या साथीने पुढे जायचे आहे, असे श्री. भांडेकर म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात श्री. अक्कर यांनी सांगितले की, समाजाच्या विकासकार्याचा गाडा एखाद्या तांत्रिक बाबींमुळे बंद पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. मंडळाचे अध्यक्ष म्हणून शरदराव भांडेकर यांची समाजाप्रती तळमळ, धडपड उल्लेखनीय ठरत आहे. अशाच लाखमोलाच्या माणसांची समाजाला पुढेही गरज आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे अक्कर म्हणाले. सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. सूत्रसंचालन केशव कुंभकर्ण यांनी केले. सुभाष दगडे यांनी आभार मानले. सभेला पुणे , मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, विदर्भ, मराठवाडा यासह राज्यभरातील मध्यवर्ती मंडळाचे जुने आणि नवीन नोंदणी झालेले सदस्य, विविध ठिकाणच्या कालिकादेवी संस्थान; तसेच महिला, युवक मंडळ, सांस्कृतिक, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, सदस्य आणि कासार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 81
Please Share
Previous Post

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे : लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण

Next Post

श्री गणेशोत्सव २०२५ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा

admin

admin

Next Post

श्री गणेशोत्सव २०२५ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ