देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा उस्मानाबाद

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे : लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण

admin by admin
July 25, 2025
in उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, महाराष्ट्र, लातूर, हिंगोली
0
लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण
Please Share

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे : लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण

उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा परभणीत सन्मान

निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील पत्रकारांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. ( छायाचित्र : उत्तम बोरसुरीकर)

परभणी : पत्रकारांच्या लेखणीद्वारेच प्रशासन आणि समाजातील चुका निदर्शनास येतात. प्रशासन व सामान्य नागरिक यांच्यात संवाद घडतो. पारदर्शकता, जबाबदारी आणि समाजप्रबोधनाची भूमिका पत्रकार पार पाडत असतात. त्यामुळे माध्यमे नेहमीच सजग असतात. पत्रकारांचा सन्मान म्हणजेच समाजाच्या सजगतेचा सन्मान आहे. लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण ठरते, असे मत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केले.

निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा शुक्रवारी, १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी श्री गावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी देवेंद्र सिंह, प्रा.दीपक रंगारी, नायब तहसीलदार सतीश रेड्डी उपस्थित होते.

श्री.गावडे म्हणाले, ” लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून सर्व माध्यमांनी बजावलेल्या जनजागृतीच्या भूमिकेमुळेच मतदानाचा टक्का वाढला आहे.” अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी, बदलत्या निवडणूक प्रक्रियेसोबतच, निवडणुकीत झालेले बदल, बदलणारे प्रवाह यासह पत्रकारांच्या भूमिकेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “लोकशाही शासन व्यवस्थेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि ती भूमिका माध्यमे अतिशय तटस्थपणे पार पाडतात. माध्यमेच भारतीय निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण करू शकली.”

या वेळी माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळेत जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजना, उपक्रमांची माहिती दिली. देवेंद्र सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान आणि पत्रकारिता, तसेचज्ञशिक्षक दीपक रंगारी यांनी वृत्तसंकलन – संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रभू दीपके, सुरेश नाईकवाडे आदींसह पत्रकारांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करीत प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. सूत्रसंचालन श्री.विधाते यांनी केले, तर श्री.धोंगडे यांनी आभार मानले.

Post Views: 67
Please Share
Previous Post

श्री हट्टेश्वर महादेवाला सहस्त्र लक्ष बेलपत्र

Next Post

शरदराव भांडेकर : कासार समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या साथीने पुढे जाऊ

admin

admin

Next Post
शरदराव भांडेकर : कासार समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या साथीने पुढे जाऊ

शरदराव भांडेकर : कासार समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या साथीने पुढे जाऊ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ