देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
in परभणी
0
‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार
Please Share

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी १ ऑगस्ट २०२६ रोजी परभणी येथे उत्साहात संपन्न झाला. या अभियानाच्या निमित्ताने कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ऑनलाईन सदस्य नोंदणी करून अभियानाला सक्रिय प्रारंभ केला.

बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉ. विलास मोरे, पर्यावरण आयाम प्रमुख डॉ. संगीता आवचार, प्रा. माधुरी देशमुख, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, जिल्हा सचिव डॉ. संदीप चव्हाण, उपाध्यक्ष भगवान करंजे, के. बी. शिंदे, भानुदास शिंदे, अब्दुल रहीम, बाबासाहेब भोसले, चंद्रकांत गवळी, माधवराव चौरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विलास मोरे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही ग्राहकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करणारी देशव्यापी संघटना असून, संघटनेची ताकद वाढविण्यासाठी सदस्य नोंदणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक गावात ग्राहक पंचायतची स्थापना करण्यावर भर देण्यात येणार असून, “गाव तिथे ग्राहक पंचायत” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.ग्राहक संरक्षण, जनजागृती, ग्राहक शिक्षण, तक्रार निवारण तसेच ग्राहकांच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑनलाईन सदस्य नोंदणीमुळे संघटनेचे कार्य अधिक गतिमान, पारदर्शक आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष ऑनलाईन सदस्य नोंदणी करून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आगामी काळात परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये विशेष सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचा तसेच ग्राहक चळवळ अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.बैठकीमुळे परभणी जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाला प्रभावी सुरुवात झाली असून, जिल्हाभरात या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post Views: 1,707
Please Share
Previous Post

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

Next Post

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ