रेल्वेच्या ४६ विशेष फेऱ्या
परभणी: दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने जालना-छपरा आणि तिरुपती-हिसार या दोन मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे. या गाड्यांच्या एकूण ४६ विशेष फेऱ्या होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जालना-छपरा विशेष गाडी
- गाडी क्रमांक: ०७६५१ (जाना ते छपरा)
- प्रवासाची वेळ: २७ ऑगस्ट ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक बुधवारी रात्री ११.३५ वाजता जालना येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता छपरा येथे पोहोचेल.
- प्रवासाचा मार्ग: औरंगाबाद, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, प्रयागराज आणि वाराणसी.
- गाडी क्रमांक: ०७६५२ (छपरा ते जालना)
- परतीची वेळ: २९ ऑगस्ट ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता छपरा येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ४.०० वाजता जालना येथे पोहोचेल.
- फेऱ्या आणि डब्बे: या गाडीच्या एकूण २८ फेऱ्या होणार असून, यात २४ डब्बे असतील.
तिरुपती-हिसार विशेष गाडी
- गाडी क्रमांक: ०७७१७ (तिरुपती ते हिसार)
- प्रवासाची वेळ: १ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक बुधवारी रात्री ११.४५ वाजता तिरुपती येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी दुपारी २.०५ वाजता हिसार येथे पोहोचेल.
- प्रवासाचा मार्ग: रेनुगुंटा, गुंटकल, काचीगुडा, नांदेड, हिंगोली आणि अकोला.
- गाडी क्रमांक: ०७७१८ (हिसार ते तिरुपती)
- परतीची वेळ: ५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक रविवारी रात्री ११.१५ वाजता हिसार येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल.
- फेऱ्या आणि डब्बे: या गाडीच्या १८ फेऱ्या होणार असून, यात २२ डब्बे असतील.





