देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिक्षकांची बदली; शाळेवर बहिष्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2025
in परभणी
0
शिक्षकांची बदली; शाळेवर बहिष्कार
Please Share

सेलू तालुक्यातील गोहेगावच्या ग्रामस्थांचे आंदोलन; नवीन शिक्षकांच्या नियुक्तीला तीव्र आक्षेप

आम्हाला आमचे शिक्षक द्या : विद्यार्थ्यांच्या भावना

परभणी, दि.११ : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गोहेगाव येथे शिक्षकांच्या बदलीवरून वाद निर्माण झाला आहे. शाळेतील शिक्षक जे.ए.धामणगावे आणि जी.आर.बोरगावकर यांची अचानक बदली करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या जागी आलेल्या दोन नवीन शिक्षकांपैकी एस.ए.दिवटे आणि बी.एस.भांडे यांच्या कार्यपद्धतीवर ते रूजू होण्यापूर्वीच ग्रामस्थांनी २० ऑगस्ट २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाला निवेदन सादर करून तीव्र आक्षेप घेतलेला आहे. दरम्यान, नवीन शिक्षक रूजू झाल्याचे समजताच संतप्त झालेल्या पालक आणि ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर २०२५ पासून शाळेवर बहिष्कार टाकला आहे. गेल्या तीन दिवसांपासून एकही विद्यार्थी शाळेत हजर झाला नाही.

ग्रामस्थांनी नवीन शिक्षकांची तत्काळ बदली करून, पूर्वीचे शिक्षक जे.ए.धामणगावे आणि श्री. बोरगावकर यांना पुन्हा गोहेगाव शाळेत नियुक्त करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत शाळेवरील बहिष्कार सुरूच ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण समिती, ग्रामपंचायत, पालक आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.

या संदर्भात गोहेगाव येथे आलेले उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण आणि केंद्रप्रमुख नूर शेख यांना ग्रामस्थांनी निवेदन सादर केले आहे. जर येत्या पाच दिवसांत प्रशासनाने योग्य कार्यवाही केली नाही, तर सेलू येथील तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यासह आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने या प्रश्नावर त्वरित तोडगा काढावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

” आम्हाला आमचे शिक्षक द्या”

दरम्यान, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोहेगाव येथे ग्रामस्थांना भेटून या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. मात्र, अद्यापही शिक्षक बदलीवरून ग्रामस्थांची नाराजी दूर झाली नाही; तर विद्यार्थ्यांनीही ” आम्हाला आमचे शिक्षक द्या” अशा भावनांना तक्रारपेटीद्वारे वाट मोकळी करून दिली आहे, असे समजते.

Post Views: 1,336
Please Share
Previous Post

जनसुरक्षा विधेयकाविरोधात सेलूमध्ये आंदोलन

Next Post

अजंठा एक्स्प्रेसचा सेलू थांबा पूर्ववत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अजंठा एक्स्प्रेसचा सेलू थांबा पूर्ववत

अजंठा एक्स्प्रेसचा सेलू थांबा पूर्ववत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ