देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

धारासुरवासियांनी घेतली आमदार गुट्टे यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2025
in परभणी
0
धारासुरवासियांनी घेतली आमदार गुट्टे यांची भेट
Please Share

धारासुर फाटा ते धारासुर रस्त्याचे काम करण्याची मागणी

परभणी : गंगाखेड मतदारसंघातील धारासुर फाटा ते धारासुर गावाकडे जाणाऱ्या सात किलोमीटर मुख्य रस्त्यापैकी उर्वरित पाच किलोमीटर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी धारासुर ग्रामस्थांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे केली. या रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून सुमारे ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, संबंधित कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

त्यामुळे हे काम पुन्हा ई-टेंडर काढून नवीन कंत्राटदाराकडून लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी विनंती गावकऱ्यांनी आमदार गुट्टे यांना केली. यासोबतच, गुप्तेश्वर मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी मंजूर झालेल्या ७८.४४ लाख रुपयांच्या जनसुविधा केंद्राचे कामही तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार गुट्टे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि या दोन्ही प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी लगेच पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, तहसीलदार गंगाखेड आणि संबंधित कंत्राटदाराच्या प्रतिनिधींना सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

यावेळी धारासुर गावचे सरपंच राजेभाऊ गवळे यांच्यासह प्रताप कदम, शेषराव कदम, सुरेश जाधव, कुलदीप जाधव, ज्ञानेश्वर जाधव, निवृत्ती कदम, जयराम कदम, अक्षय जाधव, भगवान जाधव, राजेभाऊ कदम, प्रतीक कदम, गणेश कदम, लक्ष्मण कदम, दिनेश जाधव, संभाजी ढेंबरे, पोलीस पाटील प्रतीक कदम, सुरेश कदम, बाळू रणबावरे, संभाजी ढेंबरे, दीपक कदम, हनुमान क्षिरसागर, बाळू कदम, कृष्णा कदम, कैलास कदम, मनोज कदम, अंगद कदम, राजेभाऊ डिळेकर, सर्जेराव कदम, नारायण शिंदे, बालासाहेब नेमाने, बालु काका जाधव आणि गावातील इतर अनेक नागरिक उपस्थित होते.

Post Views: 1,220
Please Share
Previous Post

पालकमंत्री मेघना बोर्डीकर थेट बांधावर

Next Post

झरी, टाकळीचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समाविष्ट करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
झरी, टाकळीचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समाविष्ट करा

झरी, टाकळीचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समाविष्ट करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ