देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘पदवीधर’ साठी मतदार नोंदणीचे आवाहन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 30, 2025
in परभणी, मराठवाडा
0
‘पदवीधर’ साठी मतदार नोंदणीचे आवाहन
Please Share

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण : २०२० च्या यादीतील पदवीधरांनाही पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक

परभणी : १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सन-२०२० मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदार यादीत नाव असलेल्या पदवीधरांनाही पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त पात्र पदवीधर मतदारांनी मतदार यादीत नव्याने नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी , ३० सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, नायब तहसीलदार सतीश रेड्डी व पत्रकार उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ भरून देणे आवश्यक आहे. हा अर्ज सर्व तहसील कार्यालये तसेच मंडळ अधिकारी (महसूल) यांच्याकडे उपलब्ध आहे.

पात्रता आणि कागदपत्रे

नोंदणीसाठी उमेदवारांनी १ नोव्हेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व विद्यापीठे तसेच सर्व मुक्त विद्यापीठे अथवा कोणत्याही अभिमत विद्यापीठाचा पदवीधर असणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये भरलेला नमुना १८ चा फॉर्म, अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची किंवा मूळ पदवीची छायांकित प्रत आणि नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट आकाराचे फोटो (फोटोचा पार्श्वभाग पांढऱ्या रंगाचा असावा) यांचा समावेश आहे. रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, वीज बिल, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा घरपट्टी यापैकी कोणताही एक कागदपत्र जोडावा लागेल. अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात स्वीकारले जातील. २०२० च्या निवडणुकीच्या वेळी परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदार यादीचे ७६ यादी भाग होते व मतदान केंद्रसंख्या ७८ होती, नंतर २ सहाय्यकारी मतदान केंद्रे झाली.

मतदार यादी कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या तारखा

१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे : जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ आहे. वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी बुधवार, १५ ऑक्टोबर तर द्वितीय पुनर्प्रसिद्धी शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी होईल. नमुना क्रमांक १८ किंवा १९ द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक गुरुवार, ६ नोव्हेंबर आहे. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई गुरुवार, २० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ पर्यंत असेल. दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे गुरुवार, २५ डिसेंबर रोजी होईल आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी आणि जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील. जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Post Views: 1,240
Please Share
Previous Post

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दिवाळीनंतर

Next Post

इंद्रायणी देवी यात्रेत हजारोंनी घेतला महाप्रसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
इंद्रायणी देवी यात्रेत हजारोंनी घेतला महाप्रसाद

इंद्रायणी देवी यात्रेत हजारोंनी घेतला महाप्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ