देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विजयादशमीवर दुष्काळाचे सावट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 2, 2025
in परभणी
0
विजयादशमीवर दुष्काळाचे सावट
Please Share

परभणी : नवरात्रोत्सवातील नववी माळ पूर्ण झाली असून, आज विजयादशमी अर्थात दसरा साजरा होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी ग्राहक नवनवीन वस्तुंची खरेदी करतात. त्यासाठी सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांची दुकाने सजली आहेत. विजयादशमीला गुंजभर तरी सोने खरेदी करावे, अशी परंपरा आहे. मात्र, यंदा परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतपिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे या वर्षीच्या दसऱ्यावर ओल्या दुष्काळाचे गडद सावट आहे. असे असुनसुद्धा ऋण काढून सण साजरा करण्याची हिमंत सर्वसामान्य माणूस ठेवून आहे. हीच भारतीय संस्कृतीची खासीयत आहे.

देवींच्या मंदिरांत भरगच्च कार्यक्रम

नवरात्री महोत्सवानिमित्ताने शहरासह जिल्ह्यातील देवींच्या मंदिरांमधून यावर्षी भाविकांची दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.यावर्षीच्या नवरात्र महोत्सवावर पावसाचे व ओल्या दुष्काळाचे सावट असले तरी, भाविकांचा उदंड उत्साह जाणवला. शहरी व ग्रामीण भागातील देवीच्या मंदिरांमधून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची प्रचंड वर्दळ राहिली. नवमीच्या निमित्तानेही आजही गर्दी कायम होती. परभणी शहरातील श्री अष्टभूजा मंदिर, आशीर्वाद नगरातील श्री देवीचे मंदिर, शनिवार बाजारातील श्री रेणुका मातेचे मंदिर, गवळी गल्लीतील श्री तुळजाभवानी मंदिर, बारबिंड गल्लीतील रेणुकामाता मंदिर, दत्तधाम जवळील श्री हिंगलाज माता मंदिरांसह अन्य मंदिरांमधून गेल्या दहा दिवसांत लाखो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. पहाटेपासून सुरू असलेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती.

जिल्ह्यातील श्रीक्षेत्र राणीसावरगाव येथील श्री रेणुका माता, गौंडगाव येथील श्री रेणुका माता, भोसा येथील इंद्रायणी देवी मंदिर, पेडगाव येथील रेणुका माता मंदिर, धर्मापुरी येथील देवी मंदिर, डिघोळ येथील जगदंबा रेणुका माता मंदिर, बोरी जवळील श्री रिडज येथील देवीचे मंदिर, आरळची अन्नपूर्णा माता मंदिर, सेलू, जिंतूर आणि भोगाव येथील जगदंबा माता मंदिरात यावर्षी भाविकांची लक्षणीय गर्दी उसळली होती. विशेषतः राणीसावरगाव, श्रीक्षेत्र भोगाव व इंद्रायणीच्या माळावरील वाहतूक भाविकांच्या गर्दीने वारंवार ठप्प होत होती.

Post Views: 1,335
Please Share
Previous Post

पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’आंदोलन

Next Post

धनगर समाजाचा जिंतूरमध्ये रास्ता रोको

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
धनगर समाजाचा जिंतूरमध्ये रास्ता रोको

धनगर समाजाचा जिंतूरमध्ये रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ