देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

धनगर समाजाचा जिंतूरमध्ये रास्ता रोको

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 2, 2025
in परभणी
0
धनगर समाजाचा जिंतूरमध्ये रास्ता रोको
Please Share

एस.टी.प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

जिंतूर : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा संविधानात ३६ व्या क्रमांकावर समावेश आहे. त्यामुळे, धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) सवलतीची अंमलबजावणी करून ‘एस.टी.’ चे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी जिंतूर येथील अण्णा भाऊ साठे पुतळ्याजवळ सकल धनगर समाजातर्फे आज जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी जालना येथील मल्हारयोद्धा दीपक भाऊ बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १५ वा दिवस आहे.

या उपोषणाच्या समर्थनार्थ यापूर्वी आमदार, खासदार यांच्या घरासमोर ढोल वाजवून धरणे आंदोलन करण्यात आले होते. आज, १ ऑक्टोबर २०२५ रोजी जिंतूरमध्ये भव्य रस्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आरक्षणाचा भंडारा उधळून रस्ता रोको केला. यावेळी समाजाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह युवकांनी समयोचित मार्गदर्शन केले. शासनाने संविधानात नमूद असलेल्या एस.टी. च्या सवलतीची त्वरित अंमलबजावणी करून धनगर समाजाची दशा संपवावी आणि त्यांना ताठ मानेने जीवन जगण्याची नवी दिशा द्यावी, अशी अपेक्षा सकल समाजाच्या वतीने कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

सेलूत ढोल बजाओ आंदोलन

सेलू : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सेलू शहरातील पाथरी रोडवरील निवासस्थानासमोर सोमवारी (दि.२९) सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत सकल धनगर समाजाच्या वतीने ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भागवत दळवे, प्रकाश मुळे, विजय दळवे, आनंद डोईफोडे, दामोधर दळवे, सोपान हारके, विठ्ठल महाराज कारके, रामप्रसाद थटवले, रामेश्‍वर खेपळ, माणिक हिंगे, विनोद शिंदे, धनंजय थटवले यांच्यासह तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान माजी आमदार बोर्डीकर यांच्या मार्फत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगर समाजासाठी घटनादत्त आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच धनगर समाजाचे संविधानिक अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

Post Views: 1,298
Please Share
Previous Post

विजयादशमीवर दुष्काळाचे सावट

Next Post

पूरग्रस्तांसाठी तातडीने अधिवेशन बोलवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पूरग्रस्तांसाठी तातडीने अधिवेशन बोलवा

पूरग्रस्तांसाठी तातडीने अधिवेशन बोलवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ