देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘टीईटी’ च्या पुनर्विचारासाठी न्यायालयीन लढाई लढणार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 28, 2025
in परभणी, मराठवाडा
0
‘टीईटी’ च्या पुनर्विचारासाठी न्यायालयीन लढाई लढणार
Please Share

पी.एस.घाडगे यांची माहिती, परभणीत मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

परभणी : सन २०१३ नंतर शिक्षकपदी रुजू झालेल्या शिक्षकांना टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परीक्षा) अनिवार्य करणे हे अन्यायकारक आणि मानसिक खच्चीकरण करणारे आहे. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेवर शासनाचाच विश्वास नसल्याचे हे द्योतक आहे आणि या निर्णयाविरुद्ध मराठवाडा शिक्षक संघ न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा विश्वास मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी.एस.घाडगे यांनी दिला.

मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीची बैठक सोमवारी, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी परभणी येथील औषधी भवनात पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी शिक्षकांना सेवाशाश्वतीपासून सेवानिवृत्तीपर्यंतचे लाभ मिळवून देणारी मराठवाडा शिक्षक संघ ही मराठवाड्यातील आद्य शैक्षणिक चळवळ असल्याची भावना व्यक्त केली.

सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्यात शिक्षणाचे खासगीकरण जोरात सुरू आहे, याला विरोध करण्याची आणि महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकरांनी ज्या सामान्य माणसाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले ते शिक्षण वाचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी राज्याचा शिक्षण विभाग प्रश्नग्रस्त बनला असून, शिक्षकांवरील अन्याय, अत्याचार, शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषणात वाढ होत आहे. मराठवाडा शिक्षक संघ अन्यायग्रस्त शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

बैठकीत छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी जोमाने करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, जिल्हा सचिव निशांत हाके, केंद्र कार्यकारिणी सदस्य विक्रम कदम, रमेश सूर्यवंशी, नारायणराव कदम, भगवानराव पुर्णे, गणेश खंडागळे, संतोष साखरे यांनी उपस्थित कार्यकारिणी सदस्यांचे स्वागत केले. बैठकीच्या सुरुवातीला माजी शिक्षणाधिकारी बी.आर.कुंडगीर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक संतोष साखरे यांनी केले. सूत्रसंचालन अमित मोगल यांनी केले, तर आभार नारायणराव कदम यांनी मानले. या बैठकीस ज्ञानोबा वरवट्टे, के.बी.औताडे, विक्रम कदम, राजकुमार सूर्यवंशी, जयपाल शेरखाणे, कालिदास धपाटे, अशोक मस्कले, बी.एस.पुर्णे, गणपत राटोळे, बसवराज स्वामी, जी.व्ही.माने, संजय येळवंते, सुधाकर भडके, संग्राम सोळंके, जगन वाघमोडे यांच्यासह मराठवाड्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,342
Please Share
Previous Post

दिवाळी सुट्टीत शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे धडे

Next Post

शासनाने तत्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शासनाने तत्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी - ॲड. प्रकाश आंबेडकर

शासनाने तत्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी - ॲड. प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ