देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दिवाळी सुट्टीत शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे धडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 28, 2025
in परभणी, मराठवाडा
0
दिवाळी सुट्टीत शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे धडे
Please Share

परभणीत वरिष्ठ, निवड आणि नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात

परभणी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि परभणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाला शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण ३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे दिवाळी सुट्टीत राज्यभरातील ५,५२७ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चे धडे दिले जात आहेत. परभणी येथील पाथरी रोडवरील जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुलात हे प्रशिक्षण विविध ४ गटांमध्ये सुरू आहे. सोमवारी एकूण ९६ शिक्षक उपस्थित आहेत. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० पर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, शिक्षण हक्क कायदा, ऑनलाइन शिक्षण, सायबर सुरक्षा, ताणतणावाचे व्यवस्थापन तसेच व्यवसाय शिक्षणासह विविध विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थ्यांचे चाचणी, स्वाध्याय, लेखी चाचणी आणि अहवाल लेखन अशा एकूण ३०० गुणांवर मूल्यमापन होणार असून उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्यासह डायटचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खुणे आणि प्रशिक्षण समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण सुरू आहे. जिजाऊ ज्ञानतीर्थचे सचिव प्राचार्य नितीन लोहट यांनी प्रशिक्षणासाठी इंटरॲक्टिव्ह डिजिटल बोर्डसह उत्तम व्यवस्था केली असल्याचे अधिव्याख्याता गणेश शिंदे यांनी सांगितले. सुलभक म्हणून शिक्षक रविंद्र हनुमंते, महादेव लोखंडे, प्रभाकर नालंदे, दिगंबर गिरी, अनिल जाधव, अंजली सावरगावकर, किरण रणवीर, किशन बनसोडे, रावसाहेब सावंत, संदीप आदमाने, संजीवकुमार सूर्यवंशी, दीपक सोळंके आणि प्रवीण गोदाम हे प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

नवनियुक्त शिक्षकांसाठीही प्रशिक्षण

दरम्यान, जिजाऊ ज्ञानतीर्थ परिसरातील वसंतराव लोहट सभागृहात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने १ जानेवारी २०१९ पासून पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त झालेल्या १०० शिक्षकांनाही २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ७ दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि ‘निपुण भारत अभियान’ यांसारख्या घटकांचा समावेश आहे. या नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणाचे समन्वय अभय परिहार हे करत असून डॉ. अमोल देशपांडे, रविकिरण सालमोटे, व्यंकटेश हराळे, संतोष सेलूकर, नीलेश पांचाळ, कुसुम कच्छवे, रत्नमाला शेळके, वनिता संगवे, मयूर जोशी, मारोती कदम, कल्पना दलाल आणि शिवप्रसाद मठपती हे सुलभक म्हणून काम पाहत आहेत.

संचालक डॉ.रेखावार यांच्या निर्णयाचे स्वागत

परभणी जिल्ह्यातील एकूण १ हजार २१५ नोंदणीकृत शिक्षकांसाठी दोन ते १२ जून या कालावधीत वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण आयोजित केले होते, मात्र एका तासिकेच्या गैरहजरीमुळे काही शिक्षक प्रशिक्षणाच्या सिस्टीमद्वारे बाहेर पडले. तर विविध कारणांनी बरेच शिक्षक अनुपस्थित राहिले होते. अशा शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी शिक्षक सेनेचे आमदार ज. मो. अभ्यंकर, मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे तसेच इतर शिक्षक संघटनांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मागणीला परिषदेचे संचालक डॉ. राहुल रेखावार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जून मधील प्रशिक्षणासाठी अनुपस्थित तसेच प्रशिक्षणोत्तर चाचणीत अनुत्तीर्ण अशा राज्यभरातील एकूण ५,५२७ शिक्षकांसाठी २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुन्हा प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणार्थींना पूर्वीच्याच नोंदणी क्रमांकावर आणि शुल्कात प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल डॉ.रेखावार यांच्या या निर्णयाचे शिक्षकांनी स्वागत केले आहे.

Post Views: 1,812
Please Share
Previous Post

सेलूत जैन समाजाचा शांततेत मोर्चा

Next Post

‘टीईटी’ च्या पुनर्विचारासाठी न्यायालयीन लढाई लढणार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘टीईटी’ च्या पुनर्विचारासाठी न्यायालयीन लढाई लढणार

'टीईटी' च्या पुनर्विचारासाठी न्यायालयीन लढाई लढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ