देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मुक्तीसंग्रामात विनायकराव चारठाणकरांचे योगदान मोलाचे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 4, 2025
in परभणी
0
मुक्तीसंग्रामात विनायकराव चारठाणकरांचे योगदान मोलाचे
Please Share

कीर्ती राऊत यांचे प्रतिपादन, स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

सेलू : स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर यांनी निजामाच्या जुलमी राजवटी विरोधात संघटनात्मक लढाई उभी करून निजामाच्या बारीक-सारीक हालचालींवर नजर ठेवून त्यांचे मनसुबे उधळून लावले. निजामांना हद्दपार करण्यासाठी सशस्त्र लढा दिला. हैदराबाद मुक्ती संग्रामात विनायकरावांचे योगदान अतुलनीय आणि मोलाचे आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम आणि विनायकराव चारठाणकर हे समीकरण झाले होते, असे प्रतिपादन नूतन कन्या प्रशालेतील सहअध्यापिका कीर्ती राऊत यांनी केले.

‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत विनायकराव चारठाणकर यांच्या जीवनचरित्रावर कीर्ती राऊत यांनी १ नोव्हेंबर शनिवारी स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर स्मृती दिनानिमित्त श्रीमती राऊत यांनी विवेचन केले.श्रीमती राऊत म्हणाल्या की, मराठवाड्यातील निजामशाहीची दहशत आणि जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी अनेकदा संघर्ष आणि लढा दिला गेला. मराठवाड्यातील पूर्वीच्या ५ जिल्ह्यांत निजामाचे रझाकारांनी हैदोस घातला होता. स्त्रियांना त्रास देणे, हिंदूंच्या देवतांची विटंबना आणि नासधूस करण्याचे प्रकार होत होते. या सर्व अत्याचाराला सडेतोड उत्तर दिले पाहिजे. या दृष्टीने काही निवडक व्यक्तींनी एकत्र येत हैदराबाद मुक्ती संग्रामात प्रत्येकाने स्वतःच्या हिमतीवर लढले पाहिजे, यावर एकमत झाले. यामध्ये विनायकराव अग्रभागी होते.

यावेळी सुरेश हिवाळे म्हणाले की, पालकाने आपल्या पाल्यांना घडवण्यासाठी एक आदर्श म्हणून ‘इंदिरेस पत्र’ या पुस्तकाकडे पाहावे आणि आपल्या पाल्यास ‘इंदिरास पत्र’ हे पुस्तक अवश्य वाचण्यास द्यावे. ‘इंदिरेस पत्र’ हे पुस्तक आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी संजीवनी आहे. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय या ठिकाणी ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत ‘इंदिरेस पत्र’ या पुस्तकाचे विवेचन करताना सुरेश हिवाळे बोलत होते.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर, सुरेश हिवाळे, किर्ती राऊत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि थोर स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश उगले यांनी केले, तर आभार रामराव गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी किरण कुंडीकर, रमेश बोराडे, वसंत पांचाळ, बाबासाहेब चारठाणकर यांच्यासह वाचक सभासद उपस्थित होते.

Post Views: 1,504
Please Share
Previous Post

असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी

Next Post

सेलू पालिका बोधचिन्हात श्री व्यंकुशाहांच्या प्रतिमेचा समावेश करावा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू पालिका बोधचिन्हात श्री व्यंकुशाहांच्या प्रतिमेचा समावेश करावा

सेलू पालिका बोधचिन्हात श्री व्यंकुशाहांच्या प्रतिमेचा समावेश करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ