देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री केशवराज बाबासाहेब यात्रा महोत्सव आजपासून

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 27, 2025
in परभणी
0
श्री केशवराज बाबासाहेब यात्रा महोत्सव आजपासून
Please Share

सेलूत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम; २२४ वर्षांची परंपरा

सेलू जि.परभणी : सेलू शहराचे ग्रामदैवत आणि श्रीसंत साईबाबांचे सद्गुरू श्री गोपाळकृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशहा) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सवास गुरुवारी, २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. शुक्रवारी, ५ डिसेंबररोजी सांगता आहे. महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दोन आठवडे मोठी यात्रा भरते.

नंदकुमार गोंदीकर महाराजांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथेस गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सकाळी ९ ते १० संहिता वाचन, दुपारी १२ ते ५ कथेचे निरूपण, शालिग्राम मुळे यांचे गुरुवारी व शुक्रवार रात्री नऊ वाजता कीर्तन आहे. शनिवारी आणि रविवारी (२९ आणि ३० नोव्हेंबर) रोजी दीपाली कुलकर्णी यांचे रात्री ९ वाजता कीर्तन आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला सोमवारी, एक डिसेंबर रोजी श्री गीता जयंती, श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी महाराजांच्या ओवीबद्ध चरित्राचे सामुदायिक पारायण, श्रीम‌द्भगवत् गीता पठण, सायंकाळी ‘श्रीं’ची आराधना, अभिषेक, महापूजा आहे. रात्री बालासाहेब नेब महाराज यांचे कीर्तन आहे. मंगळवारी, २ डिसेंबर रोजी दीपाली कुलकर्णी यांचे कीर्तन आहे. बुधवारी, ३ डिसेंबर रोजी रात्री पुरूषोत्तम महाराज वालूरकर यांचे हरिकीर्तन आहे. गुरुवारी (ता. चार) डिसेंबर रोजी श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशहा) यांच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यानिमित्त दुपारी १२ वाजता ‘श्री’ची महाआरती, दुपारी ३ वाजता ‘श्री’ची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी, ५ डिसेंबररोजी दुपारी चार वाजता भागवतकार सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन आहे. महोत्सवात लघुरुद्र अभिषेक करू इच्छिणाऱ्यांनी सुधीर मंडलिक यांच्याशी संपर्क साधावा तसेच विविध कार्यक्रमांत सहभागी व्हावे असे आवाहन केशव मंडलिक, वामन मंडलिक, पुरुषोत्तम मंडलिक आणि यात्रा समितीने केले आहे.

मंदिर परिसराला रोषणाई

यात्रा महोत्सवानिमित्त मंदिर व मंदिर परिसराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ४ डिसेंबरपासून पुढे दोन आठवडे यात्रा भरते. यात्रेत विविध कापड, भांडणी, गृहपयोगी वस्तू, खानपान साहित्याची दुकाने, पाळणे, विविध मनोरंजनात्मक खेळाने यात्रा भरते. पंचक्रोशीतील तसेच दूरदूरच्या भाविकांच्या गर्दीने परिसर फुलूणार आहे.

Post Views: 1,878
Please Share
Previous Post

भांगडिया यांची संविधानातील मूल्यांवर निष्ठा : प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी

Next Post

सेलू, मानवतमधील ५४ गावे होणार पाणीदार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू, मानवतमधील ५४ गावे होणार पाणीदार

सेलू, मानवतमधील ५४ गावे होणार पाणीदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ