देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू, मानवतमधील ५४ गावे होणार पाणीदार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 27, 2025
in परभणी
0
सेलू, मानवतमधील ५४ गावे होणार पाणीदार
Please Share

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा पुढाकार

परभणी : सेलू आणि मानवत तालुक्यातील ५४ गावांना तसेच जिंतूर तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील गावांना पुर्णा प्रकल्पातून पाणी देण्यासाठीही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
पुर्णा प्रकल्पामध्ये येलदरी (३३ टीएमसी क्षमता) व सिध्देश्वर (८.८६ टीएमसी क्षमता) ही दोन धरणे आहेत. हा प्रकल्प १ जानेवारी १९६९ पासून सिंचनासाठी सुरू झाला. पालकमंत्री बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागासाठी येलदरी धरणातून पाणी उपसा योजना राबवून सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी शासन दरबारी आग्रही मागणी लावून धरली आहे. यामध्ये केहाळ, सावंगी, हिवरखेडा, चारठाणा, भोसी, वस्सा, ब्राम्हणगावसह अनेक गावांचा समावेश आहे.
पालकमंत्री बोर्डीकर यांच्या पाठपुराव्याने १९ सप्टेंबर २०२५ रोजी जलसंपदा मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत उपसा योजनेला गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीतील आदेशानुसार, शासन स्तरावरून एजन्सी नेमून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या योजनेमुळे सुमारे २०० गावे आणि ३००० शेतकरी यांना फायदा होऊन १० हजार एकर जमीन सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या ०३ जानेवारी २०२५ च्या पत्रानुसार ही प्रस्तावित उपसा सिंचन योजना हाती घेणे शक्य आहे. मात्र, नवीन योजना प्रस्तावित करण्यापूर्वी पुर्णा प्रकल्पाचे फेर नियोजन आवश्यक असल्याने, लवकरच शासन मान्यतेस्तव प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोरडवाहू भागातील पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलण्याचा मार्ग मोकळा होईल, असे पालकमंत्री बोर्डीकर यांनी कळविले आहे.

Post Views: 1,756
Please Share
Previous Post

श्री केशवराज बाबासाहेब यात्रा महोत्सव आजपासून

Next Post

परभणीतील श्री खंडोबा यात्रा महोत्सवास सुरूवात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीतील श्री खंडोबा यात्रा महोत्सवास सुरूवात

परभणीतील श्री खंडोबा यात्रा महोत्सवास सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ