डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण

सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व. अनंत लेवडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त परभणी रोड, डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवीन स्मृतीफलकाचे अनावरण करण्यात आले.
उपस्थितांनी स्मृतीफलकास पुष्पहार अर्पण करून स्व. अनंत लेवडे यांच्या बलिदानास विनम्र अभिवादन केले.अनावरण सोहळ्यानंतर स्थानिक जिल्हा परिषद शाळेत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.या कार्यक्रमास प्रसाद महाराज काष्टे, पांडुरंग कदम, सुनील गायकवाड, गुलाबराव खेडकर, मारोतराव भिसे, बाळासाहेब पौळ, बाळासाहेब बरसाले, दत्तात्रेय बरसाले, संतोष निरवळ, राहुल गाडेकर, पवन नाईक, सुधाकर गाडेकर, नारायण परभने, वामन गांजकर, मुंजा लेवडे, प्रल्हाद लेवडे, ओम शेरे, वेदांत लेवडे, भरत शेरे, विठ्ठल शेरे, आसाराम होगे, गोविंद निरवळ, गणेश निरवळ, समाधान निरवळ, रामा परभने, बाबा परभने, अमोल निकम, कृष्णा कदम, अंजीराम गायकवाड, पांडुरंग गांजकर, ज्ञानेश्वर लेवडे, सुंदर लेवडे, बाळकृष्ण लेवडे व नितीन होगे यांच्यासह सकल मराठा समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाज, सेलू यांच्या वतीने करण्यात आले होते.




