सेलू उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन : टी.ई.टी सक्ती रद्द करण्याची मागणी
सेलू : राष्ट्रवादी शिक्षक सेलच्यावतीने सेलू येथे शुक्रवारी, ५ डिसेंबर रोजी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, सेलू यांच्यामार्फत शालेय शिक्षण मंत्री यांना सादर करण्यात आले.या निवेदनात २०१३ च्या पूर्वीच्या शिक्षकांना टी.ई.टी. सक्ती नसावी, संचमान्यतेसंबधात विद्यार्थी संख्या कमी करावी, अनावश्यक अशैक्षणिक कामे कमी करावीत, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती सुरू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर धनंजय भागवत, जिल्हा सचिव ओ.डी.देशपांडे, शरद मगर, शेषराव नागरे, सुनील मोरे, रामेश्वर कदम, संतोष कुलकर्णी, आबासाहेब सावंत, ए.बी.पवार, धनंजय मोरे, जी.एल. तोंदूलवार, सी.यु. शिंदे, एस.आर. रोंटेवाड, जे.जी.गिरी, आर.वाय. गाडेकर, पी.के. तेलगोटे, एम.एस. बेग, ए.ए.बोराडे, अभिजित कदम आदींच्या सह्या आहेत. शहरातील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय आणि श्री के.बा. विद्यालय यांनी शाळा बंद ठेऊन संपात पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले.





