देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

२४ तासांत चोरीचा छडा, आरोपी जेरबंद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 18, 2025
in परभणी
0
२४ तासांत चोरीचा छडा, आरोपी जेरबंद
Please Share

परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई

सेलू : सेलू शहरातील नवा मोंढा भागातील दोन दुकाने फोडून चारचाकी वाहनाद्वारे करण्यात आलेल्या चोरीचा छडा लावण्यात परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतूक होत असले तरी, सेलू पोलिसांना मात्र अन्य गुन्ह्यांचा छडा का लागत नाही?, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
नवा मोंढा येथील बालाजी किराणा आणि तिरुपती ट्रेडर्सच्या गोदामातून मंगळवारी, १६ डिसेंबररोजी पहाटे चोरट्यांनी चारचाकी वाहन लावून किराणा मालाची चोरी केली होती. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. परभणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी परभणीतील विकासनगरातील राजासिंग मंगलसिंग दुधानी (वय १९) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने सेलू, मंठा आणि औंढा नागनाथ येथील गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून ८ कट्टे तांदूळ, ३ कट्टे साबुदाणा, ३ कट्टे तूरडाळ, २०० नग साबण आणि गुन्ह्यात वापरलेला खंजीर असा एकूण ३७ हजार ६९४ रुपयांचा माल हस्तगत केला. आरोपीने चोरी करण्यासाठी वापरलेली इको कार ही मंठा (जि. जालना) येथून चोरली असल्याचे निष्पन्न झाले. ती कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, रवी जाधव, सूर्यकांत फड, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, जयश्री आव्हाड यांच्या ही कारवाई पथकाने केली.

घटनेची माहिती : सेलू येथील शिवाजी नगर भागात राहणारे ६० वर्षीय व्यापारी बालासाहेब मारुती सरकाळे यांच्या गोदामातून अज्ञात चोरट्याने सुमारे ३९,५१० रुपयांचा किराणा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी गोदामात शिरून ९,००० रुपये किमतीचे तूर डाळीचे ३ कट्टे, १५,०१० रुपये किमतीचे तांदळाचे ९ कट्टे आणि ४,५०० रुपये किमतीचे साबुदाण्याचे ३ कट्टे लंपास केले आहेत. यासोबतच ११,१०० रुपये किमतीचे गोदरेज नंबर वन साबणाचे ३ बॉक्सही चोरीला गेले आहेत. या चोरीबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वहाब पठाण यांनी हा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस हवालदार मुलगी करत आहेत. शहरात व्यापाऱ्याचे गोदाम फोडून चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे

Post Views: 1,792
Please Share
Previous Post

केशवराज व्याख्यानमाला : मंजूषा कुलकर्णी यांचे व्याख्यान

Next Post

सोन्न्यात जप्ती; इतरत्र वाळूतस्कर सुसाट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सोन्न्यात जप्ती; इतरत्र वाळूतस्कर सुसाट

सोन्न्यात जप्ती; इतरत्र वाळूतस्कर सुसाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ