देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

डॉ.होमी भाभा परीक्षा : ‘प्रिन्स’च्या ४५ विद्यार्थ्यांचे यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 19, 2025
in परभणी
0
डॉ.होमी भाभा परीक्षा : 'प्रिन्स'च्या ४५ विद्यार्थ्यांचे यश
Please Share

६ विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड

सेलू/प्रतिनिधी : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा २०२५ मध्ये घवघवीत यश संपादन करून जिल्ह्यात अव्वल निकालाची नोंद केली आहे. शाळेतील एकूण ६१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून त्यापैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ६ विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी म्हणजेच प्रॅक्टिकल राउंडसाठी पात्र ठरले आहेत. हे यश शाळेत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक अध्ययन पद्धतीचे फलित आहे. होमी भाभा परीक्षेच्या तयारीसाठी शाळेत विशेष अभ्यासक्रम, संकल्पनाधारित अध्यापन, प्रयोगांवर आधारित शिकवण, नियमित सराव चाचण्या व शंका निरसन सत्रे घेतली जातात. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी विषयतज्ज्ञांची व्याख्यानमाला नियमितपणे आयोजित करण्यात येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळते.

शाळेत सर्व विषयांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध असून विज्ञान, गणित, संगणक तसेच इतर विषयांचे प्रयोग व प्रात्यक्षिकांद्वारे अध्यापन केले जाते. या प्रयोगशाळा-केंद्रित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होत असून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची सवय लागते. दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ९ वी मधील सानवी मारेवार (७३ गुण) आणि कृष्णा काकडे (५९ गुण) यांचा समावेश आहे. तसेच इयत्ता ६ वी मधील प्रेरणा काष्टे (६७ गुण), प्रज्वल रोडगे (६६ गुण), उन्नती राठी (६१ गुण) आणि अभिनव धोपटे (५८ गुण) यांनीही विशेष यश मिळवले आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शाळेची शैक्षणिक दृष्टी स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये केवळ परीक्षेपुरते ज्ञान न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार, प्रयोगशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करणे हेच शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला व प्रगती क्षीरसागर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,682
Please Share
Previous Post

चर्चा तर होणारच : सत्तारोहणाचे ‘सोशल ट्रेंड’ पुन्हा चर्चेत

Next Post

प्रलंबित तक्रारी तत्काळ निकाली काढा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रलंबित तक्रारी तत्काळ निकाली काढा

प्रलंबित तक्रारी तत्काळ निकाली काढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ