देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

माजी नगराध्यक्ष बोराडे यांच्या पराभवाची हुरहूर ; कॉंग्रेसचे मिलिंद पवार ठरले वरचढ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 21, 2025
in परभणी
0
माजी नगराध्यक्ष बोराडे यांच्या पराभवाची हुरहूर ; कॉंग्रेसचे मिलिंद पवार ठरले वरचढ
Please Share

सेलू : मागील तीस वर्षांपासून नगरपालिका राजकारणात सक्रिय असलेले माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार विनोद बोराडे हे प्रभाग क्रमांक ८ अ मधून पराभूत झाले आहेत. कॉंग्रेसच्या मिलिंद पवार यांनी येथे विजय साकारला असून बोराडे यांना ८८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि जिल्ह्याच्या पालक मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळ्ण्यात त्यांना यश आले. नगराध्यक्ष पदी मिलिंद सावंत यांच्यासह १४ उमेदवारांचा विजय साकारण्यात त्याचे मोठे योगदान आहे. त्यांचा पराभव हूरहूर लावणारा आहे.

बोराडे यांचे पुतणे साईराज बोराडे यांनी प्रभाग क्रमांक एक ब मध्ये दणदणीत विजय साकारला आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांची पत्नी महानंदा आणि सुपुत्र माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांनीही दणदणीत विजय मिळवला आहे, तर आडळकर यांचे जावई आणि माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचे सुपुत्र माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाने (शिवसेना शिंदे गट) यांनीही विक्रमी मतांनी विजय साकारला आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण हेदेखील पराभूत झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे डॉ.अनिकेत जोगदंड यांनी त्यांचा पराभव करीत विजयश्री खेचून आणली आहे.

शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने लहाने यांच्या नेतृत्वाखाली संदीप लहाने आणि सपना हरि काळे,अनुपमा प्रभाकर देवधर आणि डॉ. अनिकेत अशोकराव जोगदंड यांनी विजय मिळविला आहे. कॉंग्रेसच्या विजय अन्य विजयी उमेदवारात प्रविणा संभाजी पवार, विनोद धापसे, पठाण मालनबी अफसरखान, सफिया बेगम अ.रशीद यांचा समावेश आहे. शिवसेना उबाठाच्या दोन्ही उमेदवारांना तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांच्या उमेदवारांचाही दारूण पराभव झाला आहे.

Post Views: 1,859
Please Share
Previous Post

सेलू नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदी मिलिंद सावंत

Next Post

कॉंग्रेसचे सात संघर्ष योद्धे, शिवसेनेचे धुरंधर विजेते

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कॉंग्रेसचे सात संघर्ष योद्धे, शिवसेनेचे धुरंधर विजेते

कॉंग्रेसचे सात संघर्ष योद्धे, शिवसेनेचे धुरंधर विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ