देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

डॉ.अनिकेत जोगदंड यांच्या विजयाचा धुमधडाक्यात जल्लोष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 24, 2025
in परभणी
0
डॉ.अनिकेत जोगदंड यांच्या विजयाचा धुमधडाक्यात जल्लोष
Please Share

सेलू नगरपालिका : प्रभाग दोन मधून दणदणीत विजय, शिक्षित नेतृत्व आणि सेवाभावी कार्याला सेलूच्या जनतेची पसंती

सेलू : सेलू नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०२ मधून डॉ. अनिकेत अशोकराव जोगदंड यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड ही केवळ निवडणूक यश नसून, लोकसेवेला आणि सातत्यपूर्ण कार्याला मिळालेली स्पष्ट जनमान्यता मानली जात आहे.या निवडणुकीत डॉ. जोगदंड यांनी अत्यंत प्रभावी आणि लोकाभिमुख प्रचार यंत्रणा राबवली. त्यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत, घराघरांत जाऊन समस्या जाणून घेतल्या. याच विश्वासाच्या बळावर त्यांनी माजी नगराध्यक्ष तसेच मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व असलेल्या उमेदवाराचा पराभव करून विजयश्री खेचून आणली.

वडीलांचा वारसा जपणारा लोकसेवक

डॉ.अनिकेत जोगदंड हे स्वतः उच्चशिक्षित असून शिक्षण, आरोग्य आणि प्रशासन यांचा समन्वय साधणारे आधुनिक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे वडील, दिवंगत डॉ.अशोकराव जोगदंड, हे देखील सेलू नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. हा वारसा डॉ.अनिकेत नव्या विचारसरणीसह पुढे नेत आहेत. ते शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असून राजर्षी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. दिग्गज व अनुभवी नगरसेवकाचा पराभव करून मिळवलेला हा विजय शहरातील बदलत्या राजकीय मानसिकतेचे द्योतक मानला जात आहे.त्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या लोकसेवेचा मोठा ठसा जनमानसावर आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारे तरूण नेतृत्व

पंजाब व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय मदत, १००० पेक्षा अधिक घरांमध्ये कोविड किटचे वितरण आणि शिक्षकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस आरोग्य योजना राबवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच धन्वंतरी ज्ञानाई दिंडीच्या माध्यमातून पंढरपूर दिंडी मार्गावर हजारो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली आहे. सेलू शहरासाठी आरोग्य वाहिनीद्वारे हेल्थ ऑडिट, २५०० पेक्षा अधिक नागरिकांना हेल्थ कार्ड आणि उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी व डायलिसिस युनिट उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला आहे. महिला व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबिरे, माता सुरक्षित तर घर सुरक्षित उपक्रम आणि महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान असे उपक्रम राबवले.

लोकोपयोगी उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली. प्रशासकीय स्तरावर घरपट्टीवरील शास्ती कमी करण्यासाठी अभय योजना राबवण्यावर त्यांनी भर दिला. भविष्यात मूलभूत नागरी सुविधा सक्षम करणे, आरोग्य व शिक्षण व्यवस्था मजबूत करणे आणि डिजिटल व पारदर्शक प्रशासन देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. लोकसहभागातून विकास ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. डॉ. अनिकेत जोगदंड यांचा विजय हा कार्यक्षम नेतृत्वाला मिळालेली जनतेची पावती असून शहराच्या विकासात त्यांची भूमिका निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post Views: 1,834
Please Share
Previous Post

श्रद्धा,अक्षरा, साक्षी राठोड विजेत्या

Next Post

ईव्हीएममध्ये बदल नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ईव्हीएममध्ये बदल नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये

ईव्हीएममध्ये बदल नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ