देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ईव्हीएममध्ये बदल नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 24, 2025
in परभणी
0
ईव्हीएममध्ये बदल नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये
Please Share

सेलू नगरपरिषद : निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांचे आवाहन

प्रभाग क्रमांक 4 मधील मतदान केंद्र क्रमांक 2 मतमोजणीवेळी नोंदवलेला आक्षेप; प्रशासनाकडून तात्काळ दखल

परभणी, दि. २४ : सेलू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ४, मतदान केंद्र क्रमांक २ च्या मतमोजणी दरम्यान उपस्थित उमेदवार व प्रतिनिधींनी ईव्हीएमच्या कंट्रोल युनिट (CU) क्रमांकाबाबत तोंडी व लेखी आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली. ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही बदल झालेला नसून मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व नियमांनुसार पार पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.

मतमोजणीवेळी मशीनवरील CU क्रमांक आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरील डेटा शीटमधील क्रमांक वेगळा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तपासणीत असे आढळून आले की, प्रत्यक्ष वापरलेली CU मशीन क्रमांक P33592 हीच होती. मात्र केंद्राध्यक्षांनी व्हीएम-३ व दैनंदिनीमध्ये मशीनच्या कॅरिंग केसवरील CU-7513 हा बॉडी नंबर चुकून नोंदविल्याने गैरसमज निर्माण झाला.सर्व कागदपत्रे, मशीन क्रमांक व नोंदी उमेदवार व प्रतिनिधींसमोर तपासून त्यांचे समाधान करण्यात आले.

सदर प्रकरणाविषयी सविस्तर माहिती अशी की, दि. 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीचे दिवशी मतमोजणी दरम्‍यान प्रभाग क्रं.4 मतदान केंद्र क्रमांक 2 च्‍या मतमोजणी वेळी श्री.अंभोरे, श्री योगेश दिलीप कतले व इतर उमेदवार/प्रतिनिधी उपस्थित होते. श्री.अंभोरे यांनी VM-3 वर दर्शविलेला CU चा क्रमांक आणि आम्‍हाला Whtas app ग्रुपवर दिलेल्‍या data Sheet मधील CU चा क्रमांक वेगळा असल्‍याने ती ही मशिन नाही असा केवळ तोंडी आक्षेप घेतला तसेच तदनंतर दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी योगेश कथले व शेख विखार शेख इकबाल यांनी लेखी आक्षेप अर्ज दिला. या अनुषंगाने दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीचे दिवशी मतमोजणी दरम्‍यान प्रभाग क्रं.4 मतदान केंद्र क्रमांक 2 च्‍या मतमोजणी वेळी श्री.अंभोरे, श्री योगेश दिलीप कतले व इतर उमेदवार/प्रतिनिधी यांनी VM-3 वर दर्शविलेला CU चा क्रमांक आणि आम्‍हाला Whtas app ग्रुपवर दिलेल्‍या data Sheet मधील CU चा क्रमांक वेगळा असल्‍याने ती ही मशिन नाही असा केवळ तोंडी आक्षेप घेतला होता. यावेळी वर नमुद केलेल्‍या मतदान केंद्राची प्रत्‍यक्ष मतमोजनी करतांना मतदान केंद्रावर पाठविण्‍यात आलेली CU क्रमांक No.P33592 हीच मशीन मतमोजनी कक्षामध्‍ये आणण्‍यात आली होती.

परंतु सदर मशीन सोबत केंद्राध्‍यक्ष यांनी सिलबंद केलेले मतदानाचा हिशोब VM-3 व केंद्राध्‍यक्ष दैनंदिनी यामध्‍ये मशीन वरील कोणता नंबर टाकावा हे न कळाल्‍याने त्‍यांनी वरच्‍या बाजुस नमुद Control Unit CU-7513 हा मशीन ज्‍या केस मध्‍ये ठेवतात त्‍या Carrying Case चा नंबर (बॉडी नंबर) टाकला होता. यावेळी तेथे उपस्थित असलेले श्री.अंभोरे यांनी त्‍याच वेळी त्‍यांना Carrying Case नंबर (बॉडी नंबर) CU-7513 व प्रकरणात नमुद मतदान केद्रावर प्रत्‍यक्ष देण्‍यात आलेला CU P33592 हा एकच असुन त्‍याबाबत सर्व वस्‍तुस्थिती त्‍यांच्‍या निदर्शनास आणुन त्‍यांचे शंका निरसन करण्‍यात आले होते. याच CU P33592 क्रमांकाच्‍या मतदान यंत्रावरील मतमोजनी सर्व उपस्थितासमोर करण्‍यात आली. या प्रकरणी त्‍यांचे (उमेदवार/प्रतिनिधी) संपुर्ण समाधान झाल्‍याने मतमोजनी प्रक्रीया पुर्ण झाल्‍यानंतर मतमोजणी मान्‍य असल्‍याने मतमोजनीच्‍या जोडपत्रावर स्‍वाक्ष-या केल्‍या आहेत.

उपरोक्‍त वस्‍तुस्थितीचा विचार करता मतमोजणी प्रक्रिये दरम्‍यान प्रस्‍तुत प्रकरणात उमेदवार/प्रतिनिधी यांचेसमोर CU क्रमांकाची खात्री करुनच मतमोजणी प्रक्रिया पार पाडलेली आहेसदर प्रकरणात प्रभाग क्रं.4 मतदान केंद्र क्रं.2 चे केंद्राध्‍यक्ष समीर सय्यद हाश्‍मी यांना CU मशीनचे टाकलेल्‍या क्रमांक बाबत दि.23 डिसेंबर 2025 रोजी कारणे दाखवा नोटीस देउन प्रकरणातील खुलासा 24 तासाच्‍या आत सादर करण्‍याबाबत निर्देशीत केले होते. त्‍यानुसार त्‍यांनी दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी आपला खुलासा सादर केलेला आहे. त्‍यानुसार त्‍यांना दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी CU P33592 क्रमांकाच्‍या मतदान यंत्र प्राप्‍त झालेले आहे. दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी मतदान संपल्‍यानंतर मतदान यंत्र सिंलिग करताना CU P33592 क्रमांकाच्‍या वरील बाजुस असलेले Carrying Case (बॉडी नंबर) CU-7513 हा क्रंमाक नजरचुकीने अॅड्रेस टॅग,व्हिएम-3,केंद्राध्‍यक्षाची दैनदिंनी यामध्‍ये नोंदविला आहे. यामध्‍ये CU मशीन बदलेली आहे असा कोणताही प्रकार झालेला नाही. आपणास दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी प्राप्‍त झालेले CU P33592 हीच मशीन मतदान प्रक्रिया झाल्‍यानंतर दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी तहसिल कार्यालय सेलु येथे जमा केली आहे. CU मशीनवर दोन क्रंमाक नमुद असल्‍याने अनावधानाने व नजरचुकीने CU-7513 हा क्रंमाक नमुद केलेला आहे. प्रकरणात उपरोक्‍त वस्‍तुस्थिती व मतदान केंद्राध्‍यक्षाचा खुलाशानुसार संबंधित ईव्हीएम मशीनचा कंट्रोल युनिट (सीयू) क्रमांक पी 33592 हाच आहे. मात्र केंद्राध्यक्षांकडून व्हीएम-३ व अधिकृत दैनंदिनीमध्ये नोंद करताना नजरचुकीने बॉडी केस CU7513 नोंदविला आहे. या लेखनिक चुकीमुळे शंका निर्माण झाली होती.

ईव्हीएम मशीनवरील क्रमांक, कागदपत्रे व नोंदी यांची प्रत्यक्ष तपासणी करूनच उमेदवार/प्रतिनिधी यांच्‍या शंकाचे पूर्णतः निरसन मतमोजनी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आलेले आहे. शंका निरसन झाल्यानंतर उमेदवार प्रतिनिधींनी मतमोजणीच्‍या जोडपत्रावर स्‍वाक्षरी केलेली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही बदल झालेला नसून मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व नियमांनुसार पार पडल्याचे स्पष्ट करत आहे, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.

Post Views: 1,807
Please Share
Previous Post

डॉ.अनिकेत जोगदंड यांच्या विजयाचा धुमधडाक्यात जल्लोष

Next Post

श्रीमद् भागवत महापुराण कथेला उत्साहात प्रारंभ

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीमद् भागवत महापुराण कथेला उत्साहात प्रारंभ

श्रीमद् भागवत महापुराण कथेला उत्साहात प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ