देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

ग्राहक पंचायतीचे कार्य समाजपयोगी : भूषण काळे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 1, 2026
in मराठवाडा
0
ग्राहक पंचायतीचे कार्य समाजपयोगी : भूषण काळे
Please Share

सेलूत ग्राहक जागरण दिंडी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; मान्यवरांची उपस्थिती

सेलू | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य अत्यंत कौतुकास्पद, दिशादर्शक व समाजोपयोगी असून समाजात जागरूक ग्राहक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संघटना करीत आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांनी केले.

सेलू येथे आयोजित ग्राहक जागरण दिंडी अभियानाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान परभणी जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने महिनाभर ग्राहक जागरण दिंडी अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ३१ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय सेलू व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन कन्या प्रशालेच्या सभागृहात ग्राहक प्रबोधन व दिंडी समारोप कार्यक्रमाने झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती निशा पाटील होत्या. यावेळी प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे, प्रांत पर्यावरण प्रमुख डॉ. संगीता आवचार, प्रांत लीगल सेल प्रमुख अ‍ॅड. संजय केकान, प्रांत रोजगार आयाम प्रमुख किरण बोचरे, नायब तहसीलदार विजय मोरे, मदन यादव, पुरवठा निरीक्षक ऋषिकेश पौळ, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, सुनील गायकवाड, मंजुषा कुलकर्णी, सिद्धार्थ गायकवाड, शुकाचार्य शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संगीता आवचार म्हणाल्या की, जीवन जगत असताना उपभोगावर संयम ठेवून जागरूक राहणे आवश्यक आहे. अ‍ॅड. संजय केकान यांनी फसवणूक व अन्यायाविरोधात आवाज उठविणे तसेच जागरूक, जबाबदार व संस्कारयुक्त ग्राहक घडविण्याचे कार्य संघटना प्रभावीपणे करीत असल्याचे सांगितले. डॉ. विलास मोरे यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहक चळवळीला बळ मिळत असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोप करताना श्रीमती निशा पाटील म्हणाल्या की, ग्राहक पंचायत करत असलेल्या विधायक कार्यामुळेच ग्राहक राजा जागा होतो ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले तर प्रा. के.डी. वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post Views: 1,984
Please Share
Previous Post

अंतःकरण आणि त्यातील सत्य कधीही बदलत नाही

Next Post

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ