१४ विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण; कलाशिक्षक संतोष ताल्डे यांच्या मार्गदर्शनाला देदीप्यमान यश, केंद्राचा निकाल ९३.२४ टक्के
सेलू | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक विद्यालयाने आपले यश कायम राखले आहे. या परीक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक गुणांचा ठसा उमटवत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
परीक्षेसाठी एकूण १९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यातील १४ विद्यार्थ्यांनी ए श्रेणी प्राप्त करून विशेष प्राविण्य मिळवले आहे.
या परीक्षेत अक्षरा पुंजाराम गायके, अंजनी सखाराम खंदारे, ज्ञानेश्वरी विलास खंदारे, ईश्वरी सुनील खंदारे, नंदिनी भागवत लहाने, प्रगती गजेंद्र लहाने, पुनम कैलास गिरी, समृद्धी कल्याण खंदारे, संध्या वैजनाथ साखरे, सेजल विठ्ठल लहाने, श्रद्धा दत्तात्रय सोळंके, तेजस्विनी गजानन लहाने, वैष्णवी गणेश लहाने आणि वैष्णवी हरिभाऊ काळे या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत ए श्रेणी पटकावली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक संतोष ताल्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात हे घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षांमुळे केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही, तर इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत त्यांना सवलतीचे जास्तीचे गुण मिळतात. तसेच, ललित कला क्षेत्रातील पुढील उच्च शिक्षणासाठी या प्रमाणपत्रांचा मोठा फायदा होतो. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र काका लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे. या यशामुळे संपूर्ण परिसरातून विद्यालयाचे मोठे कौतुक होत आहे.
केंद्राचा निकाल ९३.२४ टक्के
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई तर्फे सप्टेंबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आहेर बोरगाव केंद्र क्र. १२९०२७ या केंद्राने निकालाची आपली उत्कृष्ट परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या केंद्रावर सेलू शहर व तालुक्यातील एकूण १५ शाळांमधील विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. एलिमेंटरी परीक्षेत २९८ विद्यार्थी, तर इंटरमिजिएट परीक्षेत १४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दोन्ही परीक्षेत मिळून ४४६ विद्यार्थ्यांनी या केंद्रावर ती परीक्षा दिली. यामध्ये एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९५.९७ टक्के लागला तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९३.२४ टक्के लागला आहे. नितीन विद्यालयाच्या केंद्राचे परीक्षा घेण्याचे हे केवळ दुसरे वर्ष आहे. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांचा विचार करून हे केंद्र चालवले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चित्रकला परीक्षेसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या यशस्वी नियोजनाबद्दल आणि उत्कृष्ट निकालाबाबत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र काका लहाने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. परीक्षेच्या यशस्वी आयोजनात केंद्र संचालक मु.अ. सर्जेराव लहाने, केंद्र प्रमुख संतोष ताल्डे, सह केंद्रसंचालक ज्ञानेश्वर सोळंके, सुरेंद्र दिशागत, गंगाधर आवचार, पांडुरंग लाडाणे, आबासाहेब बिडवे, राजाभाऊ चव्हाण, विष्णू आंधळे, कैलास चोकनपळे, हनुमान वाघ, भगवान पवार, आहेरकर, कैलास पुंगळे, शिवाजी काळे, चैतन्य खरात तसेच प्रशालेतील सर्व कर्मचारी वृंदाने मोलाचे परिश्रम घेतले.





